'मोदी सरकारने जिद्दीपणा सोडावा'; डॉ. शाहिद जमील यांनी कोरोना सल्लागार ग्रुपचा दिला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 09:44 AM2021-05-17T09:44:17+5:302021-05-17T09:45:01+5:30

Senior virologist Shahid Jameel resigned: शाहिद जमील हे अशोका युनिव्हर्सिटीच्या त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सचे संचालक आहेत. त्यांनी नुकताच न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहिला होता. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, भारतात वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित नीती बनविण्यासाठी जिद्दी प्रतिक्रियांचा सामना करत आहेत.

Top Virologist Shahid Jameel resigns corona Panel After Criticizing Narendra Modi Government | 'मोदी सरकारने जिद्दीपणा सोडावा'; डॉ. शाहिद जमील यांनी कोरोना सल्लागार ग्रुपचा दिला राजीनामा

'मोदी सरकारने जिद्दीपणा सोडावा'; डॉ. शाहिद जमील यांनी कोरोना सल्लागार ग्रुपचा दिला राजीनामा

googlenewsNext

वरिष्ठ व्हायरॉलॉजिस्ट डॉ शाहिद जमील (Virologist Shahid Jameel) यांनी रविवारी भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) च्या वैज्ञानिक सल्लागार ग्रुपच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला आहे. शाहिद जमील हे केंद्र सरकारने बनविलेल्या एका खास सल्लागार समितीचे सदस्य होते, त्यांच्यावर व्हायरस जीनोम स्ट्रक्चरची ओळख पटविण्याची जबाबदारी होती. (Senior virologist Dr. Shahid Jameel has resigned from a forum of scientific advisers set up by the government to detect variants of the coronavirus)


कोरोना संकटात केंद्र सरकारकडून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांना कोरोनाचे जीनोम स्ट्रक्टर ओळखण्याच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचा अध्यक्ष बनविण्यात आले होते. मात्र, त्यांनी रविवारी आपल्या पदावरून राजीनामा दिला आहे. मात्र, राजीनामा का दिला हे अद्याप समोर आलेले नाही. 
शाहिद जमील हे अशोका युनिव्हर्सिटीच्या त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सचे संचालक आहेत. त्यांनी नुकताच न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहिला होता. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, भारतात वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित नीती बनविण्यासाठी जिद्दी प्रतिक्रियांचा सामना करत आहेत. या लेखातून त्यांनी मोदी सरकारला वैज्ञानिकांचे म्हणणे ऐका, तसेच कोरोना पॉलिसी बनविताना जिद्दीपणा सोडण्याचा सल्ला दिला होता. 


याचबरोबर एक व्हायरॉलॉजिस्ट म्हणून कोरोना आणि लसीकरण यावर नजर ठेवून होतो. माझ्या अंदाजानुसार कोरोनाचे अनेक व्हेरिअंट पसरत आहेत. हेच कोरोना व्हायरस कोरोनाच्या पुढच्या लाटेसाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे, असे म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला होता. 


सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. दररोज हजारो लोक बळी जात आहेत. तर लाखोंच्या संख्येने कोरोनाबाधित सापडत आहेत. ऑक्सिजन कमतरता, व्हेंटिलेटर कमतरता, बेड अनुपलब्ध, औषधांची टंचाई अशा संकटात लोक सापडले आहेत. अशावेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने लोक चिंतेत पडले आहेत. 

Web Title: Top Virologist Shahid Jameel resigns corona Panel After Criticizing Narendra Modi Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.