नवी दिल्ली : देशात शनिवारी कोरोनाचे ५७,११८ नवे रुग्ण सापडले असून ही आजवरची सर्वाधिक रुग्णसंख्यावाढ आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १७ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. तर या आजारातून आतापर्यंत १०,९४,३७४ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. शनिवारी आणखी ७६४ जण मरण पावले असून त्यामुळे कोरोनाने आतापर्यंत घेतलेल्या बळींची एकूण संख्या ३६,५११ वर पोहोचली आहे.
सध्या देशामध्ये ५,६५,१०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६४.५३ टक्के असून मृत्यूदर अवघा २.१५ टक्के आहे. जगातील कोणत्याही देशापेक्षा भारतातील मृत्यूदर सर्वात कमी आहे. जागतिक स्तरावर कोरोनामुळे ४ टक्के इतका मृत्यूदर आहे. सलग तीन दिवस कोरोनाचे ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत.देशात शनिवारी कोरोनाचे ३६,५६९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. आता उपचार सुरू असलेले रुग्ण व बरे झालेले रुग्ण यांच्या आकडेवारीत५ लाखांचा फरक पडला असून ही दिलासा देणारी गोष्ट आहे. स्वदेशात बनविलेली पहिली कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचण्यांना उत्तर प्रदेशमध्ये शनिवारपासून सुरूवात झाली. येथील राणा हॉस्पिटलमध्ये या चाचण्या करण्यात येत आहेत. या कोरोना लसीच्या मानवी चाचण्या करण्यासाठी इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेने (आयसीएमआर) देशभरातील ज्या १२ संस्था निवडल्या त्यामध्ये या हॉस्पिटलचा समावेश आहे.चाचण्यांची संख्या १ कोटी ९३ लाख 525689चाचण्या शुक्रवारी कोरोनाच्या करण्यात आल्याची माहिती इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेने दिली आहे.देशभरात आतापर्यंत करण्यातआलेल्या कोरोनाच्या एकूणचाचण्यांची संख्या झाली आहे-19358659