अमृतसर : अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (19 ऑक्टोबर) रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत. मात्र या दुर्घटनेमधून एक मुलगा केवळ आईच्या सल्ल्यामुळे सुदैवाने वाचला आहे.
Amritsar Train Tragedy: दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होणार - मुख्यमंत्री अमरिंदर सिंग
पवन कुमार असं 17 वर्षीय मुलाचं नाव असून तो देखील रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी जाणार होता. मात्र त्याची आई बिट्टू देवी यांनी पवनला घरातील सजावटीचे काम करायला सांगितले. त्यामुळे तो कार्यक्रमाला न जाता घरीच थांबला. 'आईचं ऐकलं नसतं तर मीही ट्रेनखाली चिरडलो गेलो असतो!' अशी प्रतिक्रिया दुर्घटनेनंतर पवन कुमारने दिली आहे.
Amritsar Train Tragedy: मोटरमनचं 'ते' पाऊल अधिक जीवघेणं ठरलं असतं!
पवनचं घर हे रेल्वे रूळाशेजारीच असल्याने त्याची आई बिट्टू देवी घराच्या गॅलरीत बसून रावणदहनाचा कार्यक्रम पाहत होती. त्यावेळी शेकडो लोक रुळावर उभे राहून हा कार्यक्रम पाहत असल्याच त्यांनी सांगितलं. त्याचदरम्यान समोरून भरधाव वेगाने ट्रेन आली आणि अनेक जण चिरडले गेल्याची त्यांनी महिती दिली.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी रेल्वे दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी रेल्वे दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले. पीडितांच्या कुटुंबीयांसोबत संपूर्ण देश आहे. दु:खाच्या प्रसंगी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
पाहा, कसा घडला अपघात...