पिठोरागढ (उत्तराखंड) : जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांची तुकडी येथील आदिवासींच्या खेड्यात नुकतीच त्यांची कोविड-१९ चाचणी करण्यासाठी आल्याचे समजताच ते जवळच्या जंगलात पळून गेले.कोविड चाचणी करणारे पथक शुक्रवारी आल्याचे समजताच हे लाजाळू आदिवासी जवळच्या जंगलात पळाले, असे दिदिहातचे उपविभागीय दंडाधिकारी के. एन. गोस्वामी यांनी रविवारी सांगितले. कुटा चौरानीत राहणाऱ्या औलतारी आणि जामतारी खेड्यांतील रहिवाशांची आम्ही चाचणी करणार त्या आधीच ते जंगलात गेले, असे गोस्वामी म्हणाले. गोस्वामी म्हणाले, “दिदिहार उपविभागात आठ वसाहतींत हे ५०० पेक्षा जास्त आदिवासी राहत आहेत. आम्ही कोरोना चाचणी पथक औलतारी, जामतारी आणि कुटा चौरानी खेड्यांमध्ये चाचणी करण्यास पाठविले होते. उपाशी मरण्याची भीतीकोरोना लॉकडाऊनमुळे या समाजातील लोकांकडे काही काम नाही. त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे, असे प्रशासनाला कळविण्यात आले आहे. या समाजात अन्नाचे वितरण करण्याऐवजी जीवनावश्यक वस्तू वितरित करा, अशी विनंती आम्ही प्रशासनाला केल्याचे पंत म्हणाले. या लोकांच्या दुर्दशेकडे लक्ष दिले नाही तर ते भुकेने मरण पाऊ शकतात, अशी भीती पंत यांनी व्यक्त केली. आर्थिक उत्पन्न नसल्यामुळे या लोकांकडे जीवनावश्यक वस्तूंची मोठीच टंचाई असल्याचेही ते म्हणाले.औलतारी आणि जामतारीतील एकूण १९१ जण चाचणीसाठी समोर आले व त्यांनी चाचणी करून घेतली. परंतु, कुटा चौरानीतील रहिवासी चाचणी टाळण्यासाठी जंगलात निघून गेले.” चाचणीसाठी घेतलेली स्रावाची पट्टी आम्हाला बाधित करील अशी या ग्रामस्थांना भीती होती, असेही ते म्हणाले. कुटा चौरानी खेड्यातील या समाजाचे वृद्ध सदस्य जगत सिंघिंग राजवर म्हणाले, “स्रावाची तपासणी करणारी पट्टी आम्हाला बाधित करू शकते. आम्ही आरोग्य तपासणी करून घेण्यास तयार आहोत, औषधेही घेऊ. परंतु, आमच्या शरीरात स्ट्रीप टाकू देणार नाही,” असेही राजवर म्हणाले. चाचण्यांचे महत्त्व स्थानिकांना समजावे यासाठी या समाजातील काही साक्षर, शिकलेल्या सदस्यांचे मन आमच्या पथकाने वळविण्याचा प्रयत्न केला.
CoronaVirus News: कोरोना चाचणी टाळण्यासाठी आदिवासी गेले पळून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 9:43 AM