नवी दिल्ली - भारताचे पूर्वोत्तर राज्य त्रिपुरामध्ये विधानसभेसाठी 18 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर तीन मार्च रोजी निकाल हाती येणार आहे. पण मतदानापुर्वीच भाजपाला दिलासादायक वृत्त समोर आलं आहे. न्यूज एक्सच्या ओपिनियन पोलनुसार त्रिपुरामध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. 60 सदस्य असणाऱ्या त्रिपुरामध्ये 25 वर्ष सत्तेत असणाऱ्या सीपीआईएमला सत्तेतून खाली खेचण्यात भाजपाला यश मिळणार असल्याचे ओपिनियन पोलमध्ये समोर आले आहे.
ओपिनियन पोलनुसार त्रिपुरामध्ये भाजपा पहिल्यांदाच सरकार बनवणार आहे. न्यूज एक्सच्या ओपिनियन पोलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, त्रिपुरामध्ये भाजपा आणि आईपीएफटीच्या आघाडी सरकारला 31 ते 37 जागा मिळणार आहे. तर सत्तेत असणाऱ्या सीपीआईएम पक्षाला 23 ते 29 जागांवर समाधान मानावं लागणार आहे.
काँग्रेससह अन्य पक्षाला त्रिपुरामध्ये एकही जागा मिळणार नसल्याचे ओपिनियन पोलमध्ये स्पष्ट झालं आहे. गेल्या 25 वर्षात त्रिपुरामध्ये सीपीआईएम सत्तेत होते त्यामुळे माणिक सरकारएंटी इन्कम्बेंसी फॅक्टरी वचरढ झाले आहे. तरीही मुख्यमंत्री माणिक सरकार धनपुरमध्ये विजय होणार असल्याचे समोर आलं आहे.
सर्वेनुसार, त्रिपुरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये भाजपाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. पुर्ण राज्यात भाजपाचा जलवा दिसत आहे. माणिक सरकारच्या विरोधात राज्यातील जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. जनतेच्या मनातील असंतोषाचा फायदा भाजपाला मिळू शकतो. काँग्रेसमुक्त भारत या अभियान हाती घेतलेल्या भाजपाने असम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांचे पुढील लक्ष त्रिपुरा, मेघालय आणि नगालँडमध्ये सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न असेल. यासाठी भाजपामधून प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्रिपूराचा दौरा केला आहे.