दोन बड्या रुग्णालयांचे परवाने झाले रद्द, बेजबाबदार वर्तणूक; हरयाणा व दिल्ली सरकारचे निर्णय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 01:02 AM2017-12-10T01:02:15+5:302017-12-10T01:02:28+5:30

७ वर्षांच्या मुलीच्या डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूनंतर, तिच्या पालकांना १६ लाख रुपयांचे बिल भरण्यास भाग पाडणाºया फोर्टिस रुग्णालयाचा भाडेपट्टा करार हरयाणा सरकारने रद्द केला आहे.

 Two big hospitals licensed, irresponsible behavior; Haryana and Delhi Government's decisions | दोन बड्या रुग्णालयांचे परवाने झाले रद्द, बेजबाबदार वर्तणूक; हरयाणा व दिल्ली सरकारचे निर्णय  

दोन बड्या रुग्णालयांचे परवाने झाले रद्द, बेजबाबदार वर्तणूक; हरयाणा व दिल्ली सरकारचे निर्णय  

Next

गुरगाव/ नवी दिल्ली : ७ वर्षांच्या मुलीच्या डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूनंतर, तिच्या पालकांना १६ लाख रुपयांचे बिल भरण्यास भाग पाडणाºया फोर्टिस रुग्णालयाचा भाडेपट्टा करार हरयाणा सरकारने रद्द केला आहे. दुसरीकडे जिवंत बाळाला मृत घोषित करणाºया मॅक्स हॉस्पिटलचाही परवाना दिल्ली सरकारने रद्द केला आहे.
हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी फोर्टिस रुग्णालयाचा करार, तसेच रुग्णालाचे काही परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मॅक्स हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती दिली.
गुरगावच्या फोर्टिस रुग्णालयाच्या रक्तपेढीचाही परवाना रद्द करण्यात आला आहे आणि बेजबाबदार वर्तणुकीसाठी रुग्णालयाविरोधात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. चौकशीमध्ये रुग्णालयाने बिलाची रक्कम ७00 टक्के वाढविल्याचे आढळून आले होते. आद्या सिंग या ७ वर्षांच्या मुलीला ३१ आॅगस्ट रोजी फोर्टिस रुग्णालयात दाखल केले. ती १४ सप्टेंबर रोजी मरण पावली. त्यानंतर, रुग्णालयाने दोन आठवड्यांचे १५ लाख ६0 हजार रुपयांचे बिल भरण्यास भाग पाडले. त्यात ६११ सीरिंग्ज, १,५४६ ग्लोव्हज्, औषधे, व्हेंटिलेटरचा खर्च, वेदनाशामके, प्रतिजैवके, रुग्णालयात तिला घालण्यास दिलेला गाऊन यांचा समावेश होता. दिल्लीतील शालीमार बाग परिसरात असलेल्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये एका महिलेने दोन मुलांना जन्म दिला. त्यापैकी एक जिवंत व दुसरे जन्मत:च मृत असल्याचे डॉक्टरांनी नातेवाइकांना सांगितले. नंतर दोन्ही बाळे मरण पावल्याचे सांगून त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पॉलिथीनच्या पिशवीत गुंडाळून पालकांकडे सोपवले.
अंत्यसंस्कारांसाठी जात असताना पिशवीत हालचाल जाणवली, तेव्हा दोनपैकी एक मूल जिवंत असल्याचे समजले. त्या मुलाला तातडीने दुसºया रुग्णालयात दाखल केले. मात्र, ते मूलही दोन दिवसांनी दगावले. या सगळ्या प्रकारात मॅक्स हॉस्पिटलने हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी परवानाच रद्द केल्याचे सांगितले. या हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोठाच धक्का

एकाच दिवशी दोन राज्यांनी बड्या रुग्णालयांचे परवाने रद्द केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खूपच खळबळ उडाली आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी जे प्रकार घडले, त्याचे समर्थन करणे शक्यच नाही, असे डॉक्टरांनी बोलून दाखविले.

Web Title:  Two big hospitals licensed, irresponsible behavior; Haryana and Delhi Government's decisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.