पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, 2 जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 07:43 AM2018-04-10T07:43:18+5:302018-04-10T07:49:11+5:30
पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे.
श्रीनगर - पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मूतील खौड परिसर अंतर्गत येणाऱ्या केरी सेक्टर आणि राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी परिसरात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय लष्करानंही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसे उत्तर देत असताना भारतीय लष्करातील दोन जवानांना वीरमरण आले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात महाष्ट्रातील परभणी येथील एक जवान शहीद झाला असून आणखी चार जवान जखमी झाले होते.
जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिह्यातील कृष्णाघाटी येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून मंगळवारी (3 एप्रिल) सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात एका ऑफिसरसह तीन जवान जखमी झाले आहेत. तर महाष्ट्रातील परभणीतील पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापूरे शहीद झाले.
(सैन्य भरतीचे स्वप्न पूर्ण होताच शहीद शुभम मुस्तापुरे यांनी दिले होते गाव जेवण)
Two jawans have lost their lives in ceasefire violation by Pakistan Army in Sunderbani sector along the Line of Control. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) April 10, 2018