‘त्या’ नर्सच्या दोन मुलांना २० लाख, पतीला नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:14 AM2018-05-24T00:14:36+5:302018-05-24T00:14:36+5:30

केरळ सरकारकडून मदत जाहीर

'Two' of nurses' children, 20 lakhs, husband's job | ‘त्या’ नर्सच्या दोन मुलांना २० लाख, पतीला नोकरी

‘त्या’ नर्सच्या दोन मुलांना २० लाख, पतीला नोकरी

Next

तिरुवनंतपूरम : केरळच्या कोळिकोड जिल्ह्यात निपाह विषाणूंचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची शुशुश्रा करताना स्वत:लाही त्याची लागण होऊन प्राण गमवाव्या लागलेल्या लिनी पुतुस्सेरी या तरुण नर्सच्या कुटुंबाला केरळ सरकारने आर्थिक मदत जाहीर केली.
मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी सांगितले की, लिनीच्या दोन मुलांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत दिली जाईल व तिचा पती केरळमध्ये राहायला तयार असेल तर त्यालाही सरकारी नोकरी दिली जाईल. मुलांच्या नावे बँकेत पैसे ठेवले जातील व सज्ञान होईपर्यंत त्याचे व्याज त्यांना मिळण्याची व्यवस्था केली जाईल. या विषाणू संसर्गाने ११ रुग्णांचा मृत्यू झाला. प्रत्येकाच्या कुटुंबास पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचीही त्यांनी घोषणा केली. (वृत्तसंस्था)

चार जिल्हे टाळा
प्रवासी व पर्यटकांंनी कोळिकोड, मल्लापूरम, वायनाड आणि कन्नूर या जिल्ह्याांत प्रवास करणे काही दिवस टाळावे, अशी सूचना केरळ सरकारने केली. कर्नाटकचे आठ व तमिळनाडूचे तीन या अकरा जिल्ह्यांमध्ये खबरदारीचे विशेष उपाय योजले जात आहेत.

Web Title: 'Two' of nurses' children, 20 lakhs, husband's job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.