मिराज लढाऊ विमान दुर्घटनेत दोन पायलटचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 12:20 PM2019-02-01T12:20:48+5:302019-02-01T12:33:27+5:30
बंगळूरुतील एचएएलच्या विमानतळावर शुक्रवारी सकाळी मिराज 2000 हे लढाऊ विमान कोसळून दोन पायलटांचा मृत्यू झाला.
बंगळूरू : बंगळूरुतील एचएएलच्या विमानतळावर शुक्रवारी सकाळी मिराज 2000 हे लढाऊ विमान कोसळून दोन पायलटांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे दोन्ही पायलटनी हवेत विमानाला आग लागताच पॅरॅशूटच्या साह्याने उडी मारली होती. मात्र, एक पायलट विमानाच्या अवशेषांवर पडल्याने जागीच मरण पावला, तर दुसऱ्या पायलटचा उपचारावेळी मृत्यू झाला.
मिराज 2000 हे लढाऊ विमान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने बनविलेले आहे. हे विमान हवाई आणि नौदलाच्या पायलटना प्रशिक्षण देण्यासाठी वापरले जाते.
#Visuals: Mirage 2000 trainer fighter aircraft of HAL crashes at HAL Airport in Bengaluru, one pilot dead. #Karnatakapic.twitter.com/oM4CUEPu97
— ANI (@ANI) February 1, 2019
दोन्ही पायलट प्रशिक्षणार्थी होते. त्यांचे नाव नेगी आणि अबरोल असल्याचे समजते.
तपासाचे आदेश
हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून हे विमान एचएएलद्वारे अद्ययावत केले गेले होते. तरीही या विमानाचा अपघात झाल्याने चौकशी करणार असल्याचे हवाई दलाने स्पष्ट केले.