वापर घटला; दोन हजार रुपयांच्या नोटा झाल्या दिसेनाशा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 11:50 AM2022-05-28T11:50:39+5:302022-05-28T11:51:28+5:30
वापर घटला; दहा आणि ५०० रुपयांच्या नोटांची चलती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांचे चलनातील प्रमाण लक्षणीयरीत्या घटले असून, सध्या बाजारात सर्वाधिक व्यवहार हे १० रुपये आणि ५०० रुपयांच्या चलनात होत असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून पुढे आली आहे. एप्रिल, २०१९ पासून २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई पूर्ण थांबविण्यात आलेली आहे.
१०, २०, २००, ५०० आणि
दोन हजार रुपयांच्या बनावट
नोटांचा बाजारात सुळसुळाट असल्याचे या अहवालात नमूद आहे. एकूण दोन लाख ३० हजार ९७१ बनावट नोटा आढळल्या.
सर्वाधिक व्यवहार
१० व ५०० रुपयांचे!
n भारतीय ग्राहकांचे सर्वाधिक व्यवहार हे १० रुपये आणि ५०० रुपयांच्या चलनी नोटांत होत आहेत.
n ५०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक ३४.९ टक्के इतके आहे.
n १० रुपयांच्या नोटेचे प्रमाण २१.३ टक्के आहे.
नोटा कमी कशा झाल्या?
या नोटा खराब होण्याचे प्रमाण तब्बल ८८ टक्के असून, सुमारे १,८७८ कोटी मूल्याच्या नोटा वर्षभरात खराब झाल्या. त्याऐवजी त्याच मूल्याच्या अन्य चलनातील नोटा छापल्या. यासाठी ४,९४८ कोटी ८० लाखांचा खर्च झाला.