एकाच ठिकाणी १० तासांत दोन रेल्वेगाड्या घसरल्या, अभियंता निलंबित, सुदैवाने कोणालाही इजा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 04:23 AM2017-09-20T04:23:51+5:302017-09-20T04:24:46+5:30

उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात १० तासांच्या अंतराने एकाच ठिकाणी दोन रेल्वेगाड्या रुळावरून घसरल्या. यामुळे रेल्वेमार्गांच्या दुरुस्ती आणि देखभालीतील हेळसांड पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली आहे.

Two trains were reduced in 10 hours in one place, engineer suspended, luckily no one hurt | एकाच ठिकाणी १० तासांत दोन रेल्वेगाड्या घसरल्या, अभियंता निलंबित, सुदैवाने कोणालाही इजा नाही

एकाच ठिकाणी १० तासांत दोन रेल्वेगाड्या घसरल्या, अभियंता निलंबित, सुदैवाने कोणालाही इजा नाही

Next

सीतापूर : उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात १० तासांच्या अंतराने एकाच ठिकाणी दोन रेल्वेगाड्या रुळावरून घसरल्या. यामुळे रेल्वेमार्गांच्या दुरुस्ती आणि देखभालीतील हेळसांड पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली आहे.
ईशान्य रेल्वेचे प्रवक्ते आलोक श्रीवास्तव यांनी सांगितले की, सीतापूर कॅन्टॉन्मेंट स्टेशनजवळ सोमवारी रात्री ९.४० च्या सुमारास भुरवाल-बलामाऊ पॅसेंडर गाडी ज्या ठिकाणी रुळावरून घसरली होती, नेमक्या त्याच ठिकाणी मंगळवारी सकाळी ७.१० वाजता एका मालगाडीचे इंजिन रुळांवरून घसरले. त्या भागातील रेल्वेरुळांची दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे.
आधीच्या अपघातानंतर त्या ठिकाणच्या रेल्वेरुळांची दुरुस्ती करून, मंगळवारी पहाटे १.२० वाजता त्या मार्गावरून गाड्यांची वाहतूक सुरू केल्यावर अनेक गाड्या तेथून गेल्या व त्यानंतर पुन्हा आधीच्याच ठिकाणी मालगाडीचे इंजिन घसरले. दुपारी रूळ पुन्हा ठाकठीक करेपर्यंत काही गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या.
>आधीचे तीन आपघात
७ सप्टेंबर: सोनभद्र जिल्ह्यहत शक्तिपुंज एक्स्प्रेसचे ७ डबे घसरले.
२३ आॅगस्ट: दिल्लीला जाणारी केफियत एक्स्प्रेस औरिया जिल्ह्यात घसरून २१ जखमी.
१९ आॅगस्ट: पुरी- हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसला कथौली जिल्ह्यात अपघात. २० ठार, ८० जखमी.

Web Title: Two trains were reduced in 10 hours in one place, engineer suspended, luckily no one hurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.