Diabetes in India: जगातील सर्वाधिक टाईप 1 डायबिटीसनं ग्रस्त असलेली सर्वाधिक मुलं आणि किशोरवयीन भारतात राहतात. टाईप 1 डायबिटीसचा जगातील प्रत्येक पाचवं मुल हे भारतीय आहे. भारतात दररोज ६५ मुलं अथवा तरूण डायबिटीसनं ग्रस्त होत आहेत. ही आकडेवारी टाईप 1 डायबिटीस किती मोठी समस्या आहे हे दाखवून देत आहे. इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशननुसार डायबिटीसमुळे गेल्या वर्षात जगभरात ६७ लाखांपेक्षाही अधिक मुत्यू झालेत. इतकंच नाही तर त्यांचं वय २० ते ७९ यादरम्यान होतं.
आयडीएफच्या ताज्या अहवालात असे दिसून आले आहे की जगभरात टाइप 1 डायबिटीसनं ग्रस्त मुलं आणि किशोरवयीन मुलांची संख्या वेगाने वाढत आहे. २०२१ पर्यंत, जगभरात १२.११ लाखांहून अधिक मुले आणि किशोरवयीन मुले टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त होते. यापैकी निम्म्याहून अधिक १५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यातही भारतीयांची संख्या मोठी आहे. भारतात २.२९ लाखांहून अधिक मुले आणि किशोरांना टाइप 1 डायबिटीस आहे.
डायबिटीस हा टाईप 1 आणि टाईप 2 या दोन प्रकारचा असतो. टाईप 1 डायबिटीस हा कमी वयातच होतो. यानं ग्रस्त असलेल्या व्यक्तीला इन्सुलिनची गरज भारती. यावर काही असा ठोस उपायही नाही. तर टाईप 2 डायबिटीस असलेल्या रुग्णांवर औषधं आणि थेरेपीद्वारे उपचार केले जाऊ शकतात. परंतु त्यांनाही इन्सुलिनच्या इंजेक्शनची गरज भासते.
मुलांमधील प्रमाण अधिकआकडेवारीनुसार टाईप 1 डायबिटीस असलेल्या मुलांची आणि किशोरवयीनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ आहे. गेल्या वर्षी भारतात टाईप 1 डायबिटीसच्या २४ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली. याचाच अर्थ दररोज ६५ पेक्षा अधिक जणांमध्ये टाईप 1 डायबिटीस असल्याचं दिसून आलं. आयसीएमआरनं टाईप 1 डायबिटीसच्या रुग्णांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्यात. डायबिटीस असलेल्या लोकांना कोरोनाची बाधा होण्याचा धोकाही अधिक आहे.
आयडीएफच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात ७.४ कोटी लोकांना डायबिटीस आहे. जगात यात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०४५ पर्यंत ही संख्या साडेबारा कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. याशिवाय २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांची संख्या २.२९ लाखांपेक्षा अधिक आहे. ही जगातील सर्वाधिक संख्या आहे. तर दुसरीकडे अमेरिका आणि ब्राझीलचा नंबर येतो. २०२१ मध्ये डायबिटीसमुळे ६७ लाख रुग्णांचा मृत्यू झाला होता. यापैकी सर्वाधिक १४ लाख मृत्यू चीनमध्ये झाले. तर अमेरिकेत ७ लाख आणि भारतात ६ लाख, पाकिस्तानमध्ये ४ लाख आणि जापानमध्ये २ लाख जणांचा मृत्यू झाला.