नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीत कोरोना लसीचे महत्त्व समजणाऱ्या 55 देशांपैकी पहिल्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचे युनिसेफने म्हटले आहे. तसेच, भारतात दररोज 68,500 मुले जन्माला येतात, तेथे सध्या 27 लाख मुलांना कोरोना लसीचा एकही डोस मिळू शकलेला नाही, असेही युनिसेफने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.
युनिसेफचे आरोग्य विशेषज्ञ विवेक वीरेंद्र सिंग यांनी सांगितले की, भारतातील शून्य डोस असलेल्या मुलांपैकी पन्नास टक्के मुले 11 राज्यांतील 143 जिल्ह्यांतील आहेत. लसीकरण न केलेल्या लोकांना रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे भविष्यात संसर्ग होण्याचा धोका असू शकतो. ज्या मुलांना एकही लस मिळाली नाही, ते योग्य माहितीच्या अभावामुळे किंवा इतर प्रतिबंधांमुळे असू शकते.
यामागे लसीकरणानंतरचे दुष्परिणामही आहेत. त्यामुळे अशा शंकांचे उत्तर फक्त फ्रंटलाइन वर्कर देऊ शकतात. याशिवाय, जागतिक महामारीच्या काळात 30 लाख मुलांना लसीचा एकही डोस मिळालेला नाही. पण आपली वचनबद्धता दाखवत मोदी सरकारने 2020-2021 या वर्षात शून्य डोस नसलेल्या 27 लाख मुलांची संख्या कमी केली आहे, असेही विवेक वीरेंद्र सिंग यांनी सांगितले.
112 देशांमध्ये 6.7 कोटी मुलांना लसीकरण नाहीयुनिसेफने रोग प्रतिकारशक्तीवर जारी केलेल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, जागतिक साथीच्या कोरोनाच्या उद्रेकादरम्यान 55 पैकी 52 देशांनी मुलांना लसीकरण करण्याचे महत्त्व समजले नाही, असे जनतेचे मत आहे. अहवालात इशारा देण्यात आली आहे की 112 देशांमध्ये 2019 ते 2022 दरम्यान जगभरातील 6.7 कोटी मुलांना लसीकरण करण्यात आले नाही. दक्षिण कोरिया, पापुआ न्यू गिनी, घाना, सेनेगल आणि जपान सारख्या देशांमध्ये, साथीच्या रोगाची सुरुवात झाली तेव्हा एक तृतीयांशपेक्षा जास्त मुलांना लसीकरण करण्यात आले नाही.
एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक 12,591 नवीन रुग्ण तब्बल आठ महिन्यांनंतर देशात एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक 12,591 नवीन रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 65,286 झाली आहे. कोरोनामुळे 40 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 5,31,230 झाली आहे. या दरम्यान, दररोजचा संसर्ग दर 5.46 टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर 5.32 टक्के नोंदविण्यात आला आहे. एकूण संक्रमित रुग्णांपैकी सक्रिय प्रकरणांची संख्या 0.15 टक्के आहे. कोरोनामधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.67 टक्के नोंदवला गेला आहे. मृत्यू दर 1.18 टक्के आहे. देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोरोनाविरोधी लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.