मोदीजी का था अच्छा लक्षण; इसलिए सवर्णों को मिल रहा है आरक्षण- आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 09:24 PM2019-01-08T21:24:50+5:302019-01-08T21:34:00+5:30
रामदास आठवलेंच्या कवितेनं लोकसभेत एकच हशा
नवी दिल्ली: आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं काल घेतला. याबद्दलच विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आलं. सध्या या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. सत्ताभारी भाजपा, विरोधी पक्षातील काँग्रेससह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या विधेयकासंदर्भातील स्वत:ची भूमिका मांडली. मात्र केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं भाषण सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलं. राहुल आणि मोदींची तुलना करत आठवलेंनी एक कविता सादर केली. त्यावरुन सभागृहात एकच हशा पिकला.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारनं गरीब सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. याचा मोठा फायदा भाजपाला येत्या निवडणुकीत होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर भाष्य करणारी कविता आठवलेंनी लोकसभेत सादर केली. आरक्षण, तिहेरी तलाक, रापेल डील, लोकसभा निवडणूक यांचा उल्लेख त्यांना कवितेत केला. 2019 मध्ये मोदीच जिंकतील, असा विश्वास त्यांनी कवितेतून व्यक्त केला.
वाचा आठवलेंची संपूर्ण कविता-
सवर्णोंके आरक्षण के लिए लोकसभा में लाये है बिल
इसलिए आज मुझे बहुत अच्छा हो रहा है फिल
आरक्षण के वजह से मजबूत हो रही मोदीजी की हिल
क्यूँ की राफेल में नहीं हुआ है गलत डील
हमारे मोदीजी है बहुत ही है चलाख
इसलिए लाया है आरक्षण का बिल और ट्रिपल तलाक
पीएम मोदीजी का था अच्छा लक्षण
इसलिए मिल रहा है सवर्णों को आरक्षण
राहुल नहीं बल्की मोदीजी कर रहे है देश का रक्षण
2019 में हो जायेगा काँग्रेस का भक्षण
राहुल तुम मोदीजी के साथ मत खेलो बुरी चाल
वरना हो जाएगा तुम्हारा बहुत बुरा हाल
राफेल का मत फैलाओ हमारे सामने जाल
मोदीही जितेंगे 2019 साल