Gyanvapi Mosque: AIMIM च्या प्रवक्त्याची शिवलिंगा संदर्भात वादग्रस्त पोस्ट, सायबर पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 05:33 PM2022-05-18T17:33:10+5:302022-05-18T17:34:29+5:30
AIMIM leader distasteful remarks on Shivling: अहमदाबाद सायबर क्राईमने असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष असलेल्या AIMIM चे प्रवक्ते दानिश कुरेशी यांना अटक केली आहे. दानिश यांच्यावर हिंदू देवतांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे.
ज्ञानवापी मशिदीचा वाद सुरू असतानाच अहमदाबाद सायबर क्राईमने असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष असलेल्या AIMIM चे प्रवक्ते दानिश कुरेशी यांना अटक केली आहे. दानिश यांच्यावर हिंदू देवतांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या ट्विटमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
हिंदूंच्या भावना भडकवण्याचा आरोप -
सायबर क्राइमचे अस्सिटंट कमिश्नर जेएम यादव म्हणाले, दानिश कुरैशी नावाच्या ट्विटर हँडलवरून करण्या आलेल्या या पोस्टनंतर, त्यांची टीम युजरच्या शोधात होती. ट्विटरवरील कंटेंट बहुसंख्यक समाजाच्या भावना दुखावणारा होता. टीमने सर्वप्रथम टेक्निकल रिसर्च केला आणि नंतर दानिशला अटक करण्यात आली आहे.
ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आढळल्याच्या दाव्यानंतर, AIMIM प्रवक्ता दानिशने एक वादग्रस्त पोस्ट केली होती. एवढेच नाही, तर त्याने शिवलिंगा संदर्भात वादग्रस्त भाष्यही केले होते. यानंतर त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करत, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर सायबर क्राइमच्या टीमला दानिश कुरैशी शाहपूरमध्ये असल्याचे समजले, यानंतर त्याला अटक करण्यात आली.
अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल -
यासंदर्भात, दानिश कुरेशीवर जातीय सलोखा बिघडवणे आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय त्याच्या विरोधात नरोडा आणि पालडी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.