अयोध्या विमानतळाचं नाव आता "मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम", योगी सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 10:51 AM2020-11-25T10:51:43+5:302020-11-25T11:10:35+5:30
Ayodhya Airport to be named after Lord Ram : उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने अयोध्येत तयार होणाऱ्या विमानतळाचं नाव बदललं आहे. आता या विमानतळाचं नाव "मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ" असं असणार आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यानंतर, मंदिराच्या कामाला गती मिळाली आहे. यानंतर आता उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने अयोध्येत तयार होणाऱ्या विमानतळाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता अयोध्यातील या विमानतळाचं नाव "मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ" (Maryada Purushottam Shri Ram Airport) असं असणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (24 नोव्हेंबर) झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
अयोध्येतील हे विमानतळ उत्तर प्रदेशमधील पाचवं आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे. या विमानतळाचं काम सुरू असून पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्या यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशचे सरकार श्रीराम लल्लाची नगरी अयोध्येला जगातील धार्मिक स्थळांमधील एक महत्त्वाचं, अग्रणी स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे असं म्हटलं आहे. हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्वरुपात विकसित केलं जाणार आहे.
Uttar Pradesh Cabinet clears proposal to rename the Ayodhya airport as Maryada Purushottam Sri Ram Airport, Ayodhya.
— ANI UP (@ANINewsUP) November 24, 2020
‘लव्ह जिहाद’वर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं मोठं पाऊल; विश्वासघातानं धर्म परिवर्तन केल्यास...
उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने लव्ह जिहाद विरोधात अध्यादेश काढला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा अध्यादेश मंजूर झाला. अध्यादेशानुसार, फसवणुकीने धर्म परिवर्तन केल्यास 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. याशिवाय धर्मांतर करण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांना दोन महिने अगोदर माहिती द्यावी लागणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती, आम्ही लव्ह जिहादवर नवीन कायदा आणू जेणेकरून लग्नासाठी आमिष, दबाव, धमकी किंवा फसवणूक करून लग्न करणाऱ्या घटना थांबवता येतील.
. @UPGovt की कैबिनेट में #अयोध्या स्थित एयरपोर्ट का नाम मर्यादा पुरुषोत्तम भगवान #श्रीराम जी के नाम पर किए जाने के प्रस्ताव को मंजूरी दे दी। आपकी प्रदेश सरकार #श्रीराम_लला की नगरी अयोध्या को विश्व के धार्मिक स्थलों में अग्रणी स्थान दिलाने के लिए संकल्पित है। pic.twitter.com/7NbXLvurpN
— Keshav Prasad Maurya (@kpmaurya1) November 24, 2020
यूपी सरकारचे मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह म्हणाले की, या अध्यादेशामध्ये धर्मांतरासाठी 15 हजार रुपये दंडासह 1 ते 5 वर्षांच्या तुरूंगवासाची तरतूद आहे. एससी-एसटी समाजातील अल्पवयीन आणि महिलांसोबत असं घडल्यास 25 हजार रुपये दंडासह 3-10 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा होईल. उत्तर प्रदेश सरकारने धर्म प्रतिबंधक अध्यादेश 2020अध्यादेश आणला असून कायदा व सुव्यवस्था सामान्य ठेवण्यासाठी आणि महिलांना न्याय देण्यासाठी आवश्यक असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. यापूर्वी 100 हून अधिक घटना घडल्या असून त्यामध्ये जबरदस्तीने धर्मांतर केले गेले. त्यात फसवणूक आणि सक्तीने लग्न होत असल्याचं आढळून आलं.