UPSC Recruitment 2020: लोकसेवा आयोगाने काढली भरती; शुल्क २५ रुपये, पगार 7th पे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 03:09 PM2020-12-09T15:09:10+5:302020-12-09T15:11:35+5:30
UPSC Recruitment 2020, 7th Pay Commission Job: युपीएससीने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार अर्ज करण्यासाठी वयाची अट ही जास्तीतजास्त ३० वर्षे ठेवण्यात आली आहे. आरक्षणात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे.
UPSC Recruitment 2020, 7th Pay Commission Job: लोकसेवा आयोगाने सुप्रिटेंडेंट (प्रिंटिंग) आणि स्टेटिकल ऑफिसर पदांवर भरती काढली आहे. यासाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
या जाहिरातीनुसार 01 सुप्रिटेंडेंट (प्रिंटिंग) आणि ३५ स्टॅटिकल अधिकारी पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी upsconline.nic.in वर भेट देऊन या भरतीसाठी अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर आहे.
युपीएससीने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार अर्ज करण्यासाठी वयाची अट ही जास्तीतजास्त ३० वर्षे ठेवण्यात आली आहे. आरक्षणात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. दोन्ही पदांसाठी शिक्षणाची अट ही वेगवेगळी आहे. याबाबतची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.
ओपन कॅटॅगरीच्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २५ रुपये आहे. तर आरक्षित कॅटॅगरीच्या उमेदवारांसाठी आणि महिलांसाठी निशुल्क अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे. उमेदवारांची निवड नियमानुसार प्रोबेशनवर केली जाणार आहे. अधिकृत माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन पहावे.
यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
एसबीआयमध्ये दोन दिवस शिल्लक
एसबीआयने देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या आपल्या ब्रँचमध्ये अप्रेंटिसच्या ८ हजार ५०० रिक्त जागा भरण्यासाठी आजपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. जे उमेदवार एसबीआयमध्ये अप्रेंटिसशिप करू इच्छितात त्यांनी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या sbi.co.in वर जाऊन निर्धारित प्रक्रियेचा अर्ज करावा.
एसबीआय़कडून जारी करण्यात आलेल्या अप्रेंटिस भरती जाहिरातीनुसाऱ इच्छुक उमेदवार आपला एसबीआय अप्रेंटिस अॅप्लिकेशन २०२० पुढील १० डिसेंबरपर्यंत सबमिट करू शकतील.
कुणाला करता येईल अर्ज
एसबीआय अप्रेंटिस भरती प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची पात्रता पुढीलप्रमाणे आहे. इच्छुक उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावे. आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना वयाच्या अटीत सवलत देण्यात आली आहे.
अशी होणार निवड
एसबीआय अप्रेंटिस भरती २०२०२ साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाइन लिखित परीक्षा आणि स्थानिक भाषेच्या आधारावर केली जाईल. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा परीक्षेच्या आधारावर होईल. पहिल्या टप्प्यातील ऑनलाईन लेखी परीक्षा जानेवारी २०२१ मध्ये आयोजित केली जाईल. ज्यामध्ये जनरल/फायनेंशियल अवेअरनेस, जनरल इंग्लिंश क्वांटिटेटिव्ह एप्टिट्युड आणि रीनजनिंग एबिलिटी आणि कॉम्प्युटर अॅप्टिट्युड विषयांमधील एकूण १०० प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी एक तासाचा असेल. तसेच एकूण निर्धारित गुण १०० असतील. लेखी परीक्षेमध्ये ०.२५ गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक परीक्षेसाठी निमंत्रित केले जाईल.