UPSSSC Exam Calendar 2022: 'यूपी'मध्ये ३५ लाख तरुणांसाठी खुशखबर, २४ हजार नव्या पदांसाठी होतेय भरती!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 10:34 AM2022-04-22T10:34:01+5:302022-04-22T10:35:00+5:30

Sarkari Naukri: भरती पूर्ण होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या ३४.५४ लाखाहून अधिक तरुणांची प्रतीक्षा संपणार आहे. २४,०१७ तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळणार आहेत.

upsssc exam calendar 2022 up sarkari naukri good news for youth up government to make new recruitment on 24 thousand posts lbse | UPSSSC Exam Calendar 2022: 'यूपी'मध्ये ३५ लाख तरुणांसाठी खुशखबर, २४ हजार नव्या पदांसाठी होतेय भरती!

UPSSSC Exam Calendar 2022: 'यूपी'मध्ये ३५ लाख तरुणांसाठी खुशखबर, २४ हजार नव्या पदांसाठी होतेय भरती!

Next

UPSSSC Exam Calendar : अधीनस्थ सेवा निवड आयोगाने (UPSSSC) या वर्षी होणाऱ्या गट 'C' भरतीचे कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे. आयोग २०२२ मध्ये १४ भरती परीक्षा घेईल. आयोगाच्या कॅलेंडरनुसार, भरती पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत असलेल्या ३४.५४ लाखांहून अधिक तरुणांची प्रतीक्षा संपणार आहे. या तरुणांसाठी आनंदाची बातमी म्हणजे राज्यात २४,०१७ तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळणार आहेत.

आयोगाने प्राथमिक पात्रता चाचणी (पीईटी) च्या तारखेचीही घोषणा केली आहे. द्विस्तरीय परीक्षा पद्धतीअंतर्गत दुसरी पीईटी १८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोग २०२२ मध्ये १४ लेखी परीक्षा घेणार आहे. यापैकी सुमारे १० लेखी परीक्षांमध्ये २४१८३ रिक्त पदांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये आयोग भरती करणार आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी कार्मिक विभागाच्या आगामी कृती आराखड्याचे सादरीकरण लक्षात घेऊन रिक्त पदे भरण्याची मोहीम वेगवान करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर लगेचच आयोगाने या वर्षासाठी भरतीसाठीचं कॅलेंडर प्रसिद्ध केलं आहे. आयोगाच्या कॅलेंडरमध्ये ज्या १४ भरतींच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, त्यापैकी नऊ प्रलंबित भरतींचा समावेश आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे आयोगाने तीन तारखा राखीव जाहीर केल्या आहेत. भविष्यात भरती झाल्यास किंवा घोषित परीक्षेच्या तारखेत बदल झाल्यास याचा वापर केला जाऊ शकतो. तीन आरक्षित तारखांपैकी एक तारीख ग्रामपंचायतीच्या भरतीमध्ये वापरली जाईल. यूपी लेखपालच्या ८०८५ पदांसाठी प्राथमिक परीक्षेच्या आधारे, लेखपालची मुख्य परीक्षा १९ जून रोजी होणार आहे. या सर्व १० लेखी परीक्षांमध्ये सुमारे २२ लाख उमेदवार बसणार आहेत.

Web Title: upsssc exam calendar 2022 up sarkari naukri good news for youth up government to make new recruitment on 24 thousand posts lbse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.