मुलांमधील सेल्फी वेडामुळे वाढला कॉस्मेटिक्सचा वापर,सर्वेक्षणाचा निष्कर्ष : मुलींप्रमाणे मुलेही अधिक दक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 01:19 AM2017-12-23T01:19:28+5:302017-12-23T01:19:46+5:30

१० ते १२ या वयोगटातील मुलांमधील वाढते सेल्फी वेड हे सौंदर्यप्रसाधने उत्पादक कंपन्यांच्या पथ्यावर पडले आहे. ठरावीक सौंदर्यप्रसाधनांचा वापर वाढला आहे. नेल्सनच्या सर्वेक्षणातून हे उघडकीस आले आहे.

 The use of cosmetics has increased due to self-crazy children, the survey concludes: Even boys like boys are more efficient | मुलांमधील सेल्फी वेडामुळे वाढला कॉस्मेटिक्सचा वापर,सर्वेक्षणाचा निष्कर्ष : मुलींप्रमाणे मुलेही अधिक दक्ष

मुलांमधील सेल्फी वेडामुळे वाढला कॉस्मेटिक्सचा वापर,सर्वेक्षणाचा निष्कर्ष : मुलींप्रमाणे मुलेही अधिक दक्ष

Next

नवी दिल्ली : १० ते १२ या वयोगटातील मुलांमधील वाढते सेल्फी वेड हे सौंदर्यप्रसाधने उत्पादक कंपन्यांच्या पथ्यावर पडले आहे. ठरावीक सौंदर्यप्रसाधनांचा वापर वाढला आहे. नेल्सनच्या सर्वेक्षणातून हे उघडकीस आले आहे.
वयात येणारी मुले फेसबुक, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट आदी समाजमाध्यमांवर सेल्फी व व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत असतात. आपण चांगले दिसावे यासाठीही ही मुले सजग असतात. या वयात आवश्यक असणारी सौंदर्यप्रसाधने मुले मोठ्या प्रमाणात वापरताना दिसतात, असे सर्वेक्षणात आढळून आले आहे.
सौंदर्यप्रसाधने उत्पादक कंपनी व्हीएलसीसीच्या संस्थापक वंदना लुथरा यांनी सांगितले की, पौगंडावस्थेतील मुलांना मुरूम, फुटकुळ्या, वांग व काळे डाग यासारख्या त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी मुले विविध सौंदर्यप्रसाधनांवर खर्च करतात. सौंदर्यप्रसाधन उत्पादक कंपन्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. ब्रँडतज्ज्ञ हरीश बिजूर म्हणाले की, मेक-अपचा प्रचार करणाºया इन्स्टाग्राम आयकॉन्सनी यात हातभार लावला आहे. मुलांना मोठ्यांप्रमाणे चालण्या-बोलण्यास लावले जात आहे. याचे प्रमाण आता खूपच वाढले आहे.
दिसण्याच्या बाबतीत मुलीच नव्हे, तर मुलेही दक्ष असतात. तेही हेअर जेल व डिओ वापरतात. वाढत्या कनेक्टेड युगात चांगले दिसणे आणि वाटणे हे पूर्वीपेक्षा फारच महत्त्वाचे ठरत आहे. फरम्युमचे विविध ब्रँड युवकांत लोकप्रिय आहेत.
नेल्सन इंडियाचे कार्यकारी संचालक राजेश शिराली म्हणाले की, मुली आता १५-१६ वर्षांच्या होण्याआधीच स्कीन क्रीम, फेस वॉश, मेक-अप फाउंडेशन, कलर कॉस्मेटिक्स आणि हेअर कलर वापरू लागल्या आहेत.
वयात लवकर येण्याचा परिणाम-
नेल्सनच्या अहवालात म्हटले आहे की, काही सौंदर्यप्रसाधने पूर्वपौगंडावस्थेतील मुलेही वापरतात. नेल आर्ट, सनस्क्रीन, काजळ, स्पॉटलेस क्रीम व हेअर कलर यांचा त्यात समावेश होतो.
अलीकडील काळात मुले लवकर वयात येत आहेत. त्याचा परिणाम म्हणून पूर्वी जी सौंदर्यप्रसाधने महिला १८ वर्षांच्या झाल्यानंतर वापरली जात, ती आता १२व्या वर्षीच वापरण्यात येतात.
वयात येण्याबरोबर आपण चांगले दिसले पाहिजे ही प्रेरणा निर्माण होते, त्याचा परिणाम आहे. समाजमाध्यमांनी त्यात आणखी भर घातली आहे. सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ त्यामुळे कमालीची
विस्तारली
आहे.

Web Title:  The use of cosmetics has increased due to self-crazy children, the survey concludes: Even boys like boys are more efficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Selfieसेल्फी