उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने (BJP) समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आणि बसपाच्या (BSP) छावणीवर मोठा बॉम्ब टाकला आहे. सपा-बसपचे 10 आमदार उद्या भाजपमध्ये सामील होणार आहेत. सपाच्या सदस्यांना भाजपमध्ये घेण्यात उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि भाजपचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांचा महत्त्वाचा वाटा आहे. (samajwadi party bsp 10 mlcs will join bjp tomorrow)
मिळालेल्या माहितीनुसार, सपाचे रविशंकर सिंह पप्पू, सीपी चंद, अक्षय प्रसाद सिंह आणि बसपाचे बृजेश कुमार सिंह यांच्यासह 10 एमएलसी भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत.
ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचा त्यांच्या भागात चांगला प्रभाव आहे, अशा नेत्यांना निवडणुकीपूर्वीच फोडण्याच्या भाजपचा प्रयत्नात आहे. हा त्यांचा टेस्टेड फॉर्म्युला आहे. यामुळे 2022 च्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा हा टेस्टेड फॉर्म्युला वापरण्याच्या तयारीत आहे. पण, यावेळी समाजवादी पक्ष आणि त्यांचे नेते भाजपच्या निशाण्यावर आहेत. कारण पक्षाचे ध्येय विधानसभा निवडणूक जिंकणे हेच आहे. मग तो उमेदवार स्वतःचा असो अथवा दुसऱ्या पक्षातून आलेला.
देशात 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळीही भाजपने हाच फॉर्म्युला अवलंबला होता. तेव्हा काँग्रेसचे सर्व बडे दिग्गज भाजपमध्ये सामील झाले होते आणि 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळीही भाजपने हाच फॉर्म्युला राबवला होता.