"सोशल मिडिया म्हणजे 'बेलगाम घोडा', कुणीही 'माय-बाप' नाही"; CM योगींनी कार्यकर्त्यांना दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 11:25 AM2021-08-07T11:25:19+5:302021-08-07T11:27:34+5:30

सीएम योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी पक्षाच्या आयटी सेलच्या लोकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सोशल मीडिया हा एक बेलगाम घोडा आहे, त्यामुळे यावरही लढाई लढण्यासाठी प्रत्येकाला तयार राहावे लागेल.

Uttar Pradesh CM Yogi Adityanath said social media is a belagam ghora | "सोशल मिडिया म्हणजे 'बेलगाम घोडा', कुणीही 'माय-बाप' नाही"; CM योगींनी कार्यकर्त्यांना दिला मोलाचा सल्ला

"सोशल मिडिया म्हणजे 'बेलगाम घोडा', कुणीही 'माय-बाप' नाही"; CM योगींनी कार्यकर्त्यांना दिला मोलाचा सल्ला

googlenewsNext

लखनौ - यूपी निवडणुकीपूर्वी राज्यात आपल्या तयारीत व्यस्त असलेल्या भाजपने आता सोशल मिडियावरही लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे. खुद्द सीएम योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी पक्षाच्या आयटी सेलच्या लोकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सोशल मीडिया हा एक बेलगाम घोडा आहे, त्यामुळे यावरही लढाई लढण्यासाठी प्रत्येकाला तयार राहावे लागेल. एवढेच नाही तर, यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही सतर्क राहायला सांगितले आहे. जर ते सतर्क राहिले नाही, तर प्रेसचे लोक त्यांना मिडिया ट्रायल्सचा बळी बनवू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. (Uttar Pradesh CM Yogi Adityanath said social media is a belagam ghora)

अजून एका ठिकाणाचे नाव बदलणार योगी सरकार, केंद्र सरकारला पाठवला प्रस्ताव

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री योगी म्हणाले, टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्र चालविणारे लोक औद्योगिक घराण्यांचे आहेत. पण सोशल मीडियालाला कुणीही माय-बाप नाही. टीव्ही आणि वर्तमानपत्रांमधील गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक आहेत. परंतु सोशल मिडियावर अशी कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे, अशा बेलगाम घोड्याला नियंत्रित करण्यासाठी आपल्याकडे तशा प्रकारचे प्रशिक्षण आणि तशा प्रकारची तयारी असणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री योगी म्हणाले.

Coronavirus: “PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही”

पेगाससचा सामना करण्यासाठी मुहूर्त बघू नका -
कार्यकर्त्यांना सतर्क करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, अलीकडेच यूपीच्या घटनांसंदर्भात जगातील अनेक देशांमध्ये मिडिया ट्रायल्स करण्यात आले. या घटनांमध्ये ज्या लोकांचा उत्तर प्रदेशशी काहीही संबंध नाही, असे लोकही सामील होते. तसेच, पेगासस स्पायवेअरसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, याला काउंटर करण्यासाठी तत्काळ पावले उचलायला हवीत, असे आयटी सेलच्या लोकांना सांगितले आहे.

Web Title: Uttar Pradesh CM Yogi Adityanath said social media is a belagam ghora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.