तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 12:42 PM2024-11-30T12:42:04+5:302024-11-30T12:42:18+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक विवाहित महिला ही प्रेमप्रकरणातून एका तरुणाला भेटायची. दोघेही एकमेकांविना राहू शकत नव्हते. ही बाब या तरुणाच्या आईला समजली.
उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक विवाहित महिला ही प्रेमप्रकरणातून एका तरुणाला भेटायची. दोघेही एकमेकांविना राहू शकत नव्हते. ही बाब या तरुणाच्या आईला समजली. तेव्हा तिने तिचा मुलगा आणि सदर महिला दोघांनाही या विषयावरून खडसावले. सदर तरुणाची आई आणि या विवाहित महिलेने या मुद्द्यावरून अनेकदा वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या या विवाहित महिलेने तिचा प्रियकर असलेल्या तरुणाच्या आईचा काटा काढण्याचा कट आखला आणि तिची हत्या केली.
या विवाहित महिलेने तिचा प्रियकर असलेल्या तरुणाच्या आईची हत्या केली. या विवाहित महिलेने अगदी योजनाबद्धरीतीने ही हत्या घडवून आणली. प्रियकराच्या आईची हत्या करण्यासाठी या महिलेने काही दिवसांपूर्वी एक चाकू खरेदी केला. त्यानंतर तिला रस्त्यात गाठून चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली. दरम्यान, आरोपी महिलेला पोलिसांनी अटक करत तिची रवानगी तुरुंगात केली आहे.
ही घटना मेरठमधील मेडिकल कॉलेज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगल पांडेनगर येथे घडली आहे. मंगल पांडेनगर हा भाग उच्चभ्रू लोकवस्तीचा आहे. याच भागात घरकाम करणाऱ्या दोन महिलांमध्ये प्रेमप्रकरण आणि अनैतिक संबंधांतून वाद सुरू होता. येथील दीपा नावाची महिला तिचा पती आणि तीन मुलांसह येथे राहून घरकाम करते. तर सोनी नावाची विवाहित महिला ही दीपाच्या मुलावर प्रेम करायची. मात्र हे अनैतिक संबंध आणि प्रेम प्रकरण दीपा हिला मान्य नव्हते.
दीपा ही या अनैतिक संबंधांना वारंवार विरोध करायची. तसेच त्यावरून दीपा हिने सोनीला बऱ्याचदा खडसावले होते. मात्र ही बाब सोनीला खटकली. तिने चाकू खरेदी केला आणि संधी साधून दीपा हिची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. बघ्यांची गर्दी झाली. पोलिसही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपी महिलेला अटक केली. तसेच तिची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. आता आरोपी महिलेसोबत अनैतिक संबंध असेलल्या तरुणाचा या हत्येत हात आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.