लखनौ: उत्त प्रदेशात मशिदी किंवा इतर धार्मिक स्थळांवरीन भोंगे उतरवण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता राज्यातील मदरशांबाबत योगी सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. यापूढे राज्यातील कुठल्याही नवीन मदरशांना मदरशांना सरकारी अनुदान मिळणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
अखिलेश सरकारचा निर्णय बदललाउत्तर प्रदेश सरकार यापुढे राज्यातील कोणत्याही नवीन मदरशाला अनुदान देणार नाही. मंगळवारी झालेल्या योगी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागील अखिलेश सरकारचा निर्णय रद्द करत हा नवीन निर्णय घेण्यात आला. अखिलेश यादव सरकारने अनुदान यादीत समाविष्ट केलेल्या 146 पैकी 100 मदरशांना अनुदान सुरू केले होते.
यूपीत 560 अनुदानित मदरसेआता या नवीन निर्णयाबाबत अल्पसंख्याक कल्याण आणि वक्फ मंत्री धरमपाल सिंह म्हणाले की, हे मदरसे दर्जाहिन आहेत. त्यात योग्य सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांना अनुदान मिळू शकत नाही. आता हे धोरण मंत्रिमंडळात रद्द करण्यात आल्यामुळे अनुदानाच्या यादीत कोणत्याही नवीन मदरशाचा समावेश होणार नाही. विशेष म्हणझे, सध्या यूपीमध्ये 560 मदरशांना अनुदान मिळत आहे. या अंतर्गत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते समाविष्ट आहेत.