दुर्दैवी! लग्नात आलं मोठं विघ्न; भीषण अपघातात ३२ जणांचा मृत्यू, २१ जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 09:36 AM2022-10-05T09:36:03+5:302022-10-05T09:50:06+5:30
उत्तराखंडमध्ये मंगळवारी रात्री उशीरा बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ३२ जणांचा मृत्यू झाला, तर २१ जण गंभीर जखमी झाले आहेत.
उत्तराखंडमधील पौड़ी येथे मंगळवारी रात्री उशीरा बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ३२ जणांचा मृत्यू झाला, तर २१ जण गंभीर जखमी झाले आहेत, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये ४६ प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने मदत मोहिम सुरू केली.
Uttarakhand | Rescue operation underway by SDRF after a bus carrying around 45 to 50 people fell into a gorge in the Birokhal area of Dhumakot in Pauri Garhwal district; one person has been found dead so far. pic.twitter.com/crbHXa1SQr
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 5, 2022
ही बस उत्तराखंड येथील हरिद्वार अंतर्गत लालधंग ते कारा तल्ला येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात होते. यावेळी सिमडी गावाजवळ ५०० मीटर खोल दरीत बस कोसळून हा अपघात झाला.
घटनास्थळी पोलीस आणि एसडीआरएफचे पथकाने बचाव मोहिम सुरू केली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही आपत्ती नियंत्रण कक्षाला तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले. श्रीनगर, कोटद्वार, सातपुली आणि रुद्रपूर येथील एसडीआरएफची बचाव पथके घटनास्थळी बचाव कार्यासाठी पोहोचले आहेत.
Uttarakhand | 25 people found dead in the Pauri Garwhal bus accident that took place last night in Birokhal area of Dhumakot. Police & SDRF rescued 21 people overnight; injured have been admitted to nearby hospitals: DGP Ashok Kumar
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 5, 2022
(File photo) pic.twitter.com/nFYkPA0nkn
बसमध्ये ४५ ते ५० जण होते
"या अपघातात आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २१ जणांना वाचवण्यात यश आले आहे.जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बसमध्ये ४५ ते ५० जण होते, अशी माहिती उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिली.