नवी दिल्ली: उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सत्पाल महाराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि कर्मचारी वर्ग अशा २२ जणांचे कोरोना चाचणीचे अहवालदेखील पॉझिटिव्ह आले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबद्दलची माहिती दिली आहे. सत्पाल महाराज उत्तराखंड सरकारमध्ये पर्यटन मंत्री आहेत. त्यांना कोरोना झाल्याच्या वृत्ताला राज्याचे मुख्य सचिव उत्पल कुमार सिंह यांनीदेखील दुजोरा दिला.सत्पाल महाराज यांच्या पत्नी अमरिता रावत यांना कोरोना झाल्याची माहिती कालच समोर आली. त्यानंतर महाराज यांच्या घरातील सर्व कर्मचाऱ्यांना आणि सदस्यांना क्वारंटिन करण्यात आलं. त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात तब्बल २२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं आढळून आलं. अमरिता रावत यांच्यावर ऋषीकेशमधील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे प्रवक्ते हरिश थपलियाल यांनी दिली.गेल्याच आठवड्यात दिल्लीहून काही जण सत्पाल महाराज यांच्या निवासस्थानी आले होते. त्यानंतर प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून महाराज यांच्या निवासस्थानातल्या सगळ्यांना क्वारंटिन केलं. दिल्लीहून आलेले पाहुणे घरातच वेगळ्या खोल्यांमध्ये वास्तव्यास होते, असं त्यावेळी महाराज यांनी म्हटलं होतं. गेल्या शुक्रवारी महाराज कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहिले होते. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला अनेक मंत्री आणि अधिकारीदेखील हजर होते. त्यामुळे उत्तराखंड सरकारसमोरचा धोका आणखी वाढला आहे.राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवला अन् नियमावली केली प्रसिद्धमोबाईल नंबर राहणार दहाच आकडी; 'ट्राय'च्या खुलाश्यामुळे चिंताच मिटलीनेपाळची पुन्हा आगळीक, नव्या नकाशात भारताचे तीन भाग दाखवले आपल्या हद्दीतपेट्रोलचे दर, गॅस सिलिंडर, रेशनकार्ड अन् रेल्वेसह उद्यापासून सहा नियम बदलणार, जाणून घ्या...उद्धव ठाकरेंचा अनुभव कमी पडतोय का?; अमित शहा म्हणतात...
CoronaVirus News: कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण; कुटुंबातील सदस्य, कर्मचारी मिळून तब्बल २२ जण पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 8:19 PM