वाराणसी : वृद्धाश्रमातील महिलांनी पंतप्रधान मोदींसाठी बनवल्या राख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 03:20 PM2017-08-03T15:20:49+5:302017-08-03T15:21:55+5:30
'रक्षाबंधन' हा सण भाऊ-बहिणीतील स्नेह व प्रेम व्यक्त करणारा सण. येत्या 7 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणार. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीतील दुर्गाकुंड येथील वृद्धाश्रमातील विधवा महिलांनी स्वतः राख्या बनवून पंतप्रधान मोदींना पाठवल्या आहेत.
लखनौ, दि. 3 - 'रक्षाबंधन' हा सण भाऊ-बहिणीतील स्नेह व प्रेम व्यक्त करणारा सण. येत्या 7 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणार. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीतील दुर्गाकुंड येथील वृद्धाश्रमातील विधवा महिलांनी स्वतः राख्या बनवून पंतप्रधान मोदींना पाठवल्या आहेत.
या आश्रमात राहणा-या महिला पंतप्रधानांना आपल्या भावासमान मानतात. पंतप्रधान स्वतः रक्षाबंधनादिवशी आश्रमात येऊ शकत नाहीत. मात्र आपण आपल्या हाताने बनवलेल्या राख्या तरी पंतप्रधानांपर्यंत पोहोचू शकते,अशी भावना व्यक्त करत या महिलांनी पंतप्रधान मोदींना राख्या पाठवल्या आहेत.
राख्या बनवलेल्यांपैकी एक असलेल्या मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले की, रक्षाबंधन सणासाठी प्रत्येक बहिणीच्या मनात उत्साह-आनंद असतो. या आश्रमातील महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला भाऊ मानतात. यासाठी सर्व महिलांनी स्वतःच्या हाताने मोदींसाठी राखी बनवून पाठवल्या आहेत.
तर दुसरीकडे वाराणसीतील मुस्लिम महिलांनीदेखील स्वतः हाताने पंतप्रधान मोदींसाठी राख्या बनवल्या आहेत.
UP: Women at an old age home in Varanasi prepare rakhis for Prime Minister Narendra Modi. pic.twitter.com/XPe2xZ5tSY
— ANI UP (@ANINewsUP) August 3, 2017