व्हाईस अॅडमिरल आर हरी कुमार (R Hari Kumar) हे नवे नौदल प्रमुख असतील. केंद्र सरकारनं त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. सध्या ते वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ आहेत. ते ३० नोव्हेंबर रोजी नौदल प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारतील. संरक्षण मंत्रालयानं यासंदर्भातील माहिती दिली आहे.
वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस अॅडमिरल आर. हरी कुमार यांच्याकडे नौदल प्रमुख पदाची सूत्र सोपवण्यात येणार असल्याची मंगळवारी रात्री घोषणा करण्यात आली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार विद्यमान नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग (Admiral Karambir Singh) रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. याच दिवशी आर. हरी कुमार हे आपला पदभार स्वीकारतील.
शील वर्धन सिंग CISF प्रमुखदरम्यान, भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी शीलवर्धन सिंग आणि अतुल करवाल यांची मंगळवारी अनुक्रमे सीआयएफ (CISF) आणि एनडीआरएफचे (NDRF) प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. सिंग हे बिहार केडरचे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत आणि सध्या ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विशेष संचालक म्हणून कार्यरत आहेत.