व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार नवे नौदल प्रमुख, आज स्वीकारणार पदभार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 08:24 AM2021-11-30T08:24:15+5:302021-11-30T08:24:40+5:30

व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार हे वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ आहेत.

Vice Admiral R Hari Kumar will take over as the new Chief of Naval Staff today | व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार नवे नौदल प्रमुख, आज स्वीकारणार पदभार

व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार नवे नौदल प्रमुख, आज स्वीकारणार पदभार

googlenewsNext

नवी दिल्ली: व्हाईस अॅडमिरल आर हरी कुमार(Vice Admiral R Hari Kumar) आज(मंगळवार) देशाचे नवे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील, 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असलेल्या अॅडमिरल करमबीर सिंग(Admiral Karambir Singh) यांच्याकडून दिल्लीत ते पदभार स्वीकारणार आहेत. सध्या ते वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ आहेत. 

या वर्षाच्या सुरुवातीला व्हाईस अॅडमिरल आर हरी कुमार यांनी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी व्हाईस अॅडमिरल अजित कुमार यांची जागा घेतली होती. अजित कुमार जानेवारी 2019 पासून या महत्त्वाच्या कमांडची जबाबदारी सांभाळत होत. नौदलातील 40 वर्षांच्या उत्कृष्ट कारकिर्दीनंतर व्हाइस अॅडमिरल अजित कुमार निवृत्त झाले.

हरी कुमार यांचा अल्प परीचय
12 एप्रिल 1962 रोजी जन्मलेले व्हाइस अॅडमिरल आर हरी कुमार यांना जानेवारी 1983 मध्ये भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत नियुक्त करण्यात आले. हरी कुमार यांनी विविध कमांड, कर्मचारी आणि निर्देशात्मक नियुक्तींमध्ये काम केले आहे. हरी कुमार यांच्या 'सी कमांड'मध्ये आयएनएस निशंक, मिसाइल कॉर्व्हेट, आयएनएस कोरा आणि गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आयएनएस रणवीर यांचा समावेश आहे.

आयएनएस विराटचे नेतृत्व केले

हरी कुमार यांनी भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौका INS विराटचेही नेतृत्व केले आहे. नौदलाचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईस्थित डब्ल्यूएनसीची सूत्रे कुमार यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये हाती घेतली. व्हाइस अॅडमिरल आर हरी कुमार यांनी नेव्हल वॉर कॉलेज, यूएस, आर्मी वॉर कॉलेज, महू आणि रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज, यूके येथून शिक्षण घेतले आहे.

व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग वेस्टर्न नेव्हलचे कमांड
सोमवारी व्हाईस अॅडमिरल आर हरी कुमार यांनी मुंबईत झालेल्या एका समारंभात व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांच्याकडे वेस्टर्न नेव्हल कमांडचा पदभार सोपवला. व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांच्याकडे नौदलाच्या दोन ऑपरेशनल कमांडचे प्रमुखपद आहे. वेस्टर्न नेव्हल कमांडचे कमांडिंग-इन-चीफ म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते पूर्व नौदल कमांडचे प्रमुख होते.
 

Web Title: Vice Admiral R Hari Kumar will take over as the new Chief of Naval Staff today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.