राडा! बॉयफ्रेंडवरून भांडण झालं, 5 मैत्रिणींनी मिळून एका मुलीला धू-धू धुतलं; Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 11:28 AM2022-11-29T11:28:44+5:302022-11-29T11:29:01+5:30

एका जत्रेत या मुली एकमेकींना भिडल्या. पाच मैत्रिणींनी मिळून एका मुलीला बेदम मारहाण केली. बॉयफ्रेंडवरून भांडण झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Video 5 girls beaten one girl for boyfriend in sonpur mela bihar | राडा! बॉयफ्रेंडवरून भांडण झालं, 5 मैत्रिणींनी मिळून एका मुलीला धू-धू धुतलं; Video तुफान व्हायरल

राडा! बॉयफ्रेंडवरून भांडण झालं, 5 मैत्रिणींनी मिळून एका मुलीला धू-धू धुतलं; Video तुफान व्हायरल

googlenewsNext

बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सारण जिल्ह्यामध्ये काही मुलींमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. धक्कादायक बाब म्हणजे बॉयफ्रेंडवरून मुलींचं भांडण झालं आणि हे भांडण शेवटी टोकाला गेलं. 5 मैत्रिणींनी मिळून एका मुलीला धू-धू धुतल्याची भयंकर घटना समोर आली आहे.  या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये मुलींनी एकमेकींचे केस ओढले आणि बेदम मारहाण केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका जत्रेत या मुली एकमेकींना भिडल्या. पाच मैत्रिणींनी मिळून एका मुलीला बेदम मारहाण केली. बॉयफ्रेंडवरून भांडण झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी या भांडणाचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हायरल व्हिडीओमध्ये काही मुली एका मुलीला मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात येत होती. तसेच तिचे केस ओढत तिला खाली पाडलं. याच दरम्यान एक मुलगा त्या मुलींचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मुली त्याला देखील मारहाण करतात. या मुलीली बॉयफ्रेंडसोबत जत्रेत फिरताना त्यांनी पाहिलं आणि रागाच्या भरात मारहाण करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Video 5 girls beaten one girl for boyfriend in sonpur mela bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.