नवी दिल्ली - संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून लोकसभा सभागृहात भाजपाध्यक्ष अमित शहा आणि असुदुद्दीन औवेसी यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळालं. चर्चेदरम्यान, सरकारतर्फे खासदार सत्यपालसिंह बाजू मांडत होते. त्याचवेळी, एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी आक्षेप घेत सत्यपाल सिंह यांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, असुदुद्दीन औवेसी यांच्या या प्रतिक्रियेला आक्षेप घेत, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ओवैसींना खडसावले.
लोकसभेत सोमवारी एनआयए म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीला अधिक मजबूत बनविणारे सुधारणा विधेयक संमत करण्यात आले. या चर्चेवेळी सरकारतर्फे सत्यपाल सिंह बाजू मांडत होते. त्यावेळी, सभागृहात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. औवेसी यांनी सत्यपालसिंह यांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, गृहमंत्री अमित शहा यांनी सत्यपालसिंह यांची बाजू घेत औवेसींना खडे बोल सुनावले. औवेसीजी सुन तो लिया करो, असे म्हणत शाह यांनी औवेसींना गप्प बसवले.
मुंबईने दहशतवादाला खूप सहन केले आहे, कारण मुंबईत नेहमीच राजकीय चश्म्यातून दहशतवाद पाहिला गेला, असे सत्यपाल सिंह आपल्या भाषणात म्हणत होते. तसेच, हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी काही संशयित अल्पसंख्यांक समुदायाच्या नागरिकांना ताब्यात घेतले. त्यावेळी, चक्क मुख्यमंत्र्यांनी तसे न करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांना नोकरीवरुन काढून टाकण्यापर्यंतही सुनावण्यात आल्याचे सत्यपालसिंह यांनी म्हटले. त्यामुळे हैदराबादचे खासदार असुदुद्दीने औवेसी यांनी सिंह यांच्या भाषणाला आक्षेप घेतला. मात्र, अमित शहा यांनी औवेसांनी खाली बसण्यास सांगितले. तुम्हाला ऐकावचं लागेल, असे म्हणत औवेसींना टोलाही लगावला.
औवेसी साहब सुनने की ताकद रखिए, जब ए राजा बोल रहे थे तब आप क्यों नही खडे हुए, एैसे नही चलेगा, आपको सुनना भी पडेगा.. असे म्हणत अमित शहा यांनी औवेसींना चांगलाच दम भरला. त्यानंतर, सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.