Video - तुफान राडा! विद्यार्थ्यांसमोरच 3 शिक्षिका भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 02:13 PM2022-10-05T14:13:04+5:302022-10-05T14:19:59+5:30
एका माध्यमिक शाळेत 3 शिक्षिक एकमेकांना भिडल्या. जवळपास 45 मिनिटे तिघींमध्ये हाणामारी सुरू होती.
उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विद्यार्थ्यांसमोरच शिक्षिका एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. सरकारी शाळेत हा संतापजनक प्रकार घडला आहे. हमीरपूर येथील एका माध्यमिक शाळेत 3 शिक्षिका एकमेकांना भिडल्या. जवळपास 45 मिनिटे तिघींमध्ये हाणामारी सुरू होती. याच दरम्यान, शाळेतील मुलांनी तिघींना वेगळं करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही शिक्षिका भांडतच राहिल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, हे भांडण मोठा आवाज आणि फोनमध्ये व्हिडीओ बनवण्यावरून झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिक्षिकांच्या भांडणाचा हा व्हिडिओ 2 ऑक्टोबरचा आहे. हे प्रकरण हमीरपूरच्या कुरारा शहरातील मुलींच्या पूर्व माध्यमिक शाळेशी संबंधित आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तिन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. प्रीती निगम या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून तैनात आहेत. 2 ऑक्टोबर रोजी शाळेत गांधी जयंतीचा कार्यक्रम सुरू होता.
A fight broke out between the two female teacher of Govt School in Hamirpur Uttar Pradesh. pic.twitter.com/iC69WoZzhv
— Ahmed Khabeer احمد خبیر (@AhmedKhabeer_) October 3, 2022
विद्यार्थी नृत्य, गाण्याचे कार्यक्रम करत होते. शाळेत जवळपास 50-60 मुलं उपस्थित होती. सहाय्यक शिक्षिका नाहिद हाश्मी कार्यक्रमस्थळी बसल्या होत्या. तेवढ्यात मुख्याध्यापिका प्रीती तिथे आल्या. नाहिद हाश्मी यांनी प्रीतीवर ओरडण्यास सुरुवात केली. तसेच मुलांना बाहेर जाण्यास मनाई केली. दोघींमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच दोघांमध्ये बाचाबाची झाली. वर्गात बसलेली काही मुलं बाहेर धावली. त्याचवेळी काहींनी दोघींना थांबवण्याचा प्रयत्न केला.
भांडण पाहून शेजारी उभ्या असलेल्या पुष्पलता पांडे यांनी दोघांचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. यावर प्रीती पुष्पलता यांच्यावर भडकल्या. ती त्याच्या जवळ आली आणि त्याची पर्स हिसकावू लागली. व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्यात हाणामारीही सुरू झाली. या तिन्ही शिक्षिकांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.