Sputnik V production: रशियाची लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) चे उत्पादन भारतात सुरू झाले आहे. रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) आणि पॅनेसिया बायोटेकने (Panacea Biotec) मिळून ही लस बनविण्यास आजपासून सरुवात केली आहे. पॅनेसिया वर्षाला 10 कोटी डोस बनविणार आहे. स्पुतनिक लस ही कोरोनाविरोधात अधिक परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Russian Direct Investment Fund in collaboration with Delhi’s Panacea Biotec will produce 100 million doses of Sputnik V.)
Sputnik V Exclusive: रशियात राहणाऱ्या ठाणेकरानं घेतलेत Sputnik V चे दोन्ही डोस; जाणून घ्या त्यांचा अनुभव अन् लसीचे साईड इफेक्टआरडीआयएफने सांगितले की, पॅनेसिया बायोटेकने बनविलेली लसीची पहिली बॅच ही क्वालिटी कंट्रोलसाठी स्पुतनिक व्ही विकसित करणाऱ्या रशियाच्या इन्स्टिट्यूट ऑफ गॅमेलियाला पाठविली जाणार आहे. यानंतर या लसीचे पूर्ण क्षमतेने उत्पादन लवकरच सुरु करण्यात येणार आहे. पॅनेसिया बायोटेक सीरमसारखीच अनेक लसी आणि औषधे बनविते. याची स्थापना 1984 मध्ये करण्यात आली होती. तसेच 1995 मध्ये पॅनेसिया बायोटेक लिमिटेड नावाने रजिस्टर झाली होती.
Sputnik V Price: मोठी बातमी! रशियाच्या Sputnik V लशीची किंमत जाहीर; एक डोस 995.40 रुपयांना मिळणार
आरडीआयएफचे सीईओ किरिल दिमित्रीदेव यांनी याचे स्वागत केले आहे. पॅनेसिया बायोटेकमध्ये स्पुतनिक व्ही लसीचे उत्पादन सुरु होणे हे भारतात कोरोना महामारीविरोधातील एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. रशियाची ही लस पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये वेगवेगळे एडेनोव्हायरसचा वापर केला जातो. ही लस 65 देशांमध्ये रजिस्टर झाली असून ही लस कोरोनावर 91.6 टक्के परिणामकारक आहे.
रशियाची सॉवरन वेल्थ फंड रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या लसीसाठी फंडिंग करते. भारतातील पाच कंपन्यांसोबत लसीच्या उत्पादनासाठी करार करण्यात आला आहे. भारताला या लसीचे आतापर्यंत 2,10,000 डोस मिळाले आहेत. मे अखेरीस 30 लाख डोस मिळणार आहेत, तर जूनमध्ये ही संख्या वाढून 50 लाख होणार आहे.