Video - हृदयद्रावक! कोणती ट्रेन 10 मिनिटात लखनौला नेईल? वडिलांच्या मृत्यूनंतर लेकाचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 12:48 PM2023-03-22T12:48:48+5:302023-03-22T12:49:47+5:30
आजारी वडिलांच्या मृत्यूनंतर लहान मुलाचा व्हिडीओ भावूक करणारा आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची घटना समोर आली आहे. येथील रुग्णाची प्रकृती खालावताच त्याला लखनौला रेफर करण्यात आले. मात्र 10 मिनिटांतच रुग्णाचा मृत्यू झाला. आता मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या 11 वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की, एक दिवसापूर्वी वडिलांची तब्येत बिघडू लागली होती. मात्र एकाही डॉक्टरने त्यांची तपासणी केली नाही.
आजारी वडिलांच्या मृत्यूनंतर लहान मुलाचा व्हिडीओ भावूक करणारा आहे. व्हिडिओमध्ये मुलाने डॉक्टरांना प्रश्न विचारला आहे की, 10 मिनिटांत लखनौला पोहोचणारी ट्रेन कोणती आहे? लखीमपूर खेरी येथील रहिवासी 54 वर्षीय रामचंद्र पांडे यांची प्रकृती गुरुवारी बिघडली होती. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नातेवाइकांनी सांगितले की रामचंद्र यांचे बीपी कमी Peल्याने त्यांना इमर्जन्सीमध्ये दाखल करण्यात आले होते. जिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील वॉर्डातील 23 क्रमांकाच्या बेडवर हलवण्यात आले.
भ्रष्ट और लापरवाह सिस्टम ने मासूम के सर से छीना पिता का साया!
— Aam Aadmi Party- Uttar Pradesh (@AAPUttarPradesh) March 20, 2023
पिता की मौत के 10 मिनट पहले डॉक्टरों ने 10 मिनट में लखनऊ ले जाने को कहा
"ऐसी कौन सी ट्रेन है जो 10 मिनट में लखनऊ पहुंचा देगी"?
स्वास्थ्य मंत्री से लेकर मुख्यमंत्री महोदय, लखीमपुर में मासूम के सवाल का जवाब कौन देगा? pic.twitter.com/QU2ozZkdTO
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. मात्र रात्र होऊन दुपारी एक वाजेपर्यंत एकही डॉक्टर तपासणीसाठी आला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डॉक्टर त्यांच्याकडे तपासणीसाठी आले असता त्यांची प्रकृती खालावलेली पाहून त्यांनी त्यांना लखनौला रेफर करण्यास सांगितले. मात्र 10 मिनिटांनी रामचंद्र पांडे यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा आदर्श पांडे डॉक्टरांवर रागावला आणि रडत आदर्श म्हणाला, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. माझ्या वडिलांना रात्री दाखल झाल्यापासून आजपर्यंत कोणीही डॉक्टर त्यांना भेटायला आलेला नाही.
आदर्श पांडे पुढे म्हणाला, "मृत्यूच्या 10 मिनिटांपूर्वी आम्हाला त्यांना लखनौला घेऊन जाण्यास सांगण्यात आले होते, पण कोणती ट्रेन त्यांच्या वडिलांना 10 मिनिटांत लखनौला घेऊन जाऊ शकते? आता माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारे परत आणा." 11 वर्षांच्या निष्पाप मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सीएमओ लखीमपूर यांच्याकडून या संदर्भात अहवाल मागवला आहे. यासोबतच दोषींवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"