Video - संतापजनक! ट्रॅफिक कॉन्स्टेबलची दादागिरी; डिलिव्हरी बॉयला भररस्त्यात केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 09:18 AM2022-06-05T09:18:29+5:302022-06-05T09:20:03+5:30

Video - सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल फूड डिलिव्हरी बॉयच्या कानाखाली मारताना दिसत आहे.

Video traffic constable transferred in police control room for slapping food delivery man | Video - संतापजनक! ट्रॅफिक कॉन्स्टेबलची दादागिरी; डिलिव्हरी बॉयला भररस्त्यात केली मारहाण

फोटो - सोशल मीडिया

Next

नवी दिल्ली - तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे ड्युटीवर असताना एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलने फूड डिलिव्हरी बॉयला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल फूड डिलिव्हरी बॉयच्या कानाखाली मारताना दिसत आहे. आता प्रशासनाने या कॉन्स्टेबलवर कारवाई करत त्याची शहरातील पोलीस नियंत्रण कक्षात बदली केल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंगनल्लूर पोलीस ठाण्यातील ग्रेड-1 कॉन्स्टेबल सतीश याने शुक्रवारी अविनाशी रोडवरील ट्रॅफिक जंक्शनवर डिलिव्हरी बॉयच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि कॉन्स्टेबलची कंट्रोल रूममध्ये बदली केली. मोहनसुंदरम असं या फूड डिलिव्हरी बॉयचं नाव आहे. 

मोहनसुंदरम गेल्या दोन वर्षांपासून फूड एग्रीगेटर स्विगीसोबत डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करतो. त्याने सांगितलं की, शुक्रवारी संध्याकाळी एका खासगी शाळेच्या बस चालकाने भरधाव वेगात आणि बेदरकारपणे गाडी चालवली होती. वर्दळीच्या रस्त्यावरील एका मॉलजवळ बस दोन दुचाकींना आणि एका वाटसरूला धडकणार होती. त्याने चालकाला विचारणा करताच काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

दुसर्‍या प्रवाशाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये, कॉन्स्टेबलने डिलिव्हरी बॉयला दोनदा शिवीगाळ आणि कानशिलात मारताना दिसत आहे. त्याचा फोन हिसकावून घेतला आणि बाईकचंही नुकसान केलं. मोहनसुंदरम यांनी शनिवारी शहर पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे, अधिकाऱ्यांनी ट्रॅफिक कॉन्स्टेबल सतीशला नियंत्रण कक्षात हलवले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Video traffic constable transferred in police control room for slapping food delivery man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.