नवी दिल्ली - बॅंकांना हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झालेला व्यावसायिक विजय माल्ल्या याने आपल्यावरील कारवाई चुकीची असून भाजपावर निशाणा साधला आहे. विजय माल्ल्याने ट्विट करत सांगितले की, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की, त्यांच्या सरकारने माझ्या बँक कर्जापेक्षा अधिक वसूली माझ्याकडून केली आहे. तर भाजपाच्या प्रवक्त्ते माझ्याविरोधात वक्तव्यं का करत आहे? असा प्रश्न विजय माल्ल्याने उपस्थित केला.
विजय माल्ल्याने याने रविवारी ट्विटवरून भाजपाच्या नेत्यांना सवाल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीचा आधार घेत विजय माल्ल्या याने ट्विटमध्ये लिहलं की, पंतप्रधानांची मुलाखत बघितली, ज्यामध्ये ते माझं नावं घेऊन सांगतात की, विजय माल्ल्याने बँकांचे 9 हजार करोड घेऊन फरार झाले असले तरी त्यांच्या केंद्र सरकारने माल्ल्या यांची 14 हजार करोड रुपये संपत्ती जप्त केली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याकडून वसूली केल्याची कबुली केली आहे मग भाजपाच्या प्रवक्त्यांची माझ्याविरोधात विधानं का सुरु आहेत ?
यापुढे ट्विटमध्ये विजय माल्ल्याने म्हटलंय की, भारताने मला पोस्टर बॉय बनवलं आहे. जेवढं माझ्यावर कर्ज होतं त्यापेक्षा अधिक वसूली माझ्याकडून सरकारने केली आहे. 1992 पासून मी युकेमध्ये राहत आहे असं असताना मला फरार म्हणणं भाजपाला योग्य वाटतं.
काही दिवसांपूर्वी विजय माल्ल्याने सरकारी बँकांनी माझ्याकडे पैसै घ्यावेत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला वाचवावे, अशी ऑफर दिली होती. जेट एअरवेज कंपनी आर्थिक अडचणीत असून कंपनीचे चेअरमन नरेश गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर माल्ल्याने ट्विट केलं होतं. जेट एअरवेजला मदत करणाऱ्या सरकारने किंगफिशर एअरलाईन्सला का मदत केली नाही, असा सवाल त्याने उपस्थित केला होता. जेट एअरवेज अडचणीत असताना सरकारी बँका मदतीला धावल्या आहेत. हे चित्र पाहून छान वाटते. मात्र हीच मदत किंगफिशर एअरलाईन्स अडचणीत असताना का करण्यात आली नाही, असा प्रश्न विचारत विजय माल्ल्याकडून विचारत एनडीए सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला होता.