'हिंसा समस्याचं समाधान नाही, मोदी सरकारने कृषी कायदे वापस घ्यावेत'
By महेश गलांडे | Published: January 26, 2021 03:05 PM2021-01-26T15:05:19+5:302021-01-26T15:33:10+5:30
गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांकडून आज दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे.
नवी दिल्ली - राजधानीतील दिल्लीत आज ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आलंय. परंतु, या रॅलीला आता हिंसक वळण लागले आहे. दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी अडवल्यामुळे पोलीस आणि शेतकरी आंदोलकांमधील संघर्ष वाढत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांवर दगडफेक आणि ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर बचावात्मक पवित्रा पत्करत पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराचे नळकांडी फोडली. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर आपला मोर्चा वळवळा असून लाल किल्ल्यावरच किसान आंदोलनाच ध्वज फडकवला आहे. त्यामुळे, आंदोलनाल हिंसक वळण लागलंय.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरु शेतकऱ्यांना हिंसक न होण्याचं आवाहन केलंय. तसेच, मोदी सरकारने त्वरीत हे तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, असेही सूचवले आहे. राहुल यांनी ट्विट केले आहे की, हिंसा हे कुठल्याच समस्येचं समाधान नाही. इजा कोणालाही होऊ द्या, नुकसान आपल्याच देशाचं होणार आहे. देशाच्या हितासाठी कृषी विरोधी कायदे माघारी घ्या, असे राहुल यांनी आपल्या टिवटर अकाऊंटवरुन म्हटलंय.
हिंसा किसी समस्या का हल नहीं है। चोट किसी को भी लगे, नुक़सान हमारे देश का ही होगा।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 26, 2021
देशहित के लिए कृषि-विरोधी क़ानून वापस लो!
गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांकडून आज दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहण्यास मिळाले आहे. दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटला आहे. एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत रस्त्यावर उभ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. लाल किल्ला परिसरात आंदोलक नियंत्रणाबाहेर गेल्याचं चित्र असून तलवार आणि काठ्या घेऊन पोलिसांचा पाठलाग करतानाचं दृश्य पहायला मिळत आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजपथावरील संचलन (परेड) पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे.
#WATCH A protestor hoists a flag from the ramparts of the Red Fort in Delhi#FarmLaws#RepublicDaypic.twitter.com/Mn6oeGLrxJ
— ANI (@ANI) January 26, 2021
तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्या मोर्चात २.५ लाख ट्रॅक्टरसह ५ लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला होता. मात्र, मोर्चात फक्त ५ हजार ट्रॅक्टर आणि तितच्याच संख्येने आंदोलकांच्या सहभागाची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तीनही मोर्चे दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत काढले जाणार होते. पोलिसांनीही शेतकऱ्यांवर लाठीमार केला असून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. त्यामुळेच, शेतकरी आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे अतिशय संयमी आणि अहिंसक आंदोलन होते. मात्र, शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटल्यानं दिल्लीतील आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.