रियल हिरो! केरळमधील वीज कर्मचाऱ्यांचा फोटो व्हायरल, नेटीझन्सचा 'सॅल्यूट' 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 01:57 PM2018-08-17T13:57:17+5:302018-08-17T13:58:12+5:30

Kerala Floods : केरळमध्ये पावसाच्या पाण्यात ताज्या माहितीनुसार 167 जणांचा जीव गेला असून मदत आणि बचावकार्य वेगात सुरू आहे. देशभरातून केरळमधील जनतेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. वरुणराजाला थांबण्यासाठी साकडे घालण्यात येत आहे. हे सर्व होत असतानाच

Viral Photos of real hero who helps in Kerala Floods | रियल हिरो! केरळमधील वीज कर्मचाऱ्यांचा फोटो व्हायरल, नेटीझन्सचा 'सॅल्यूट' 

रियल हिरो! केरळमधील वीज कर्मचाऱ्यांचा फोटो व्हायरल, नेटीझन्सचा 'सॅल्यूट' 

Next

तिरुवअनंतपुरम - केरळमध्ये पावसामुळे हाहाकार माजला आहे. नेहमीच्या पावसापेक्षा साधारणत: 250 टक्के जास्तीचा पाऊस झाल्याचे सांगण्यात येत असून येथील नद्यांना महापूर आला आहे. ताज्या माहितीनुसार 167 जणांचा जीव गेला असून मदत आणि बचावकार्य वेगात सुरू आहे. देशभरातून केरळमधील जनतेसाठी प्रार्थना करण्यात येत आहेत. वरुणराजाला थांबण्यासाठी साकडे घालण्यात येत आहे. हे सर्व होत असताना, केरळच्या वीज वितरण विभागातील कर्चचाऱ्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसधार कोसळणाऱ्या पावसात कर्तव्य बजावणाऱ्या या जिगरबाज कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूट ठोकण्यात येत आहे. 

केरळमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोरदार पावसानं आलेल्या पुरात आतापर्यंत 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. हवामान खात्यानं राज्यातील 14 पैकी 13 जिल्ह्यांत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच सेंट्रल वॉटर कमिशनही पुराचं पाणी तुंबणाऱ्या भागावर नजर ठेवून आहे. मुसळधार पावसानं आतापर्यंत 167 जणांचा बळी घेतला आहे. एनडीआरएफच्या पाच टीम तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाल्या आहेत. सध्या एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसेच एनडीआरएफची आणखी जवान केरळमध्ये दाखल होणार आहेत.

अबब! केरळमधल्या पुरात आतापर्यंत 167 जणांचा मृत्यू, 8 हजार कोटींहून अधिकचं नुकसान

पावसानंतर महापूर आल्याने अनेक ठिकाणी विजेच्या समस्या निर्माण झाल्या असून वीज वितरण विभागाकडून काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवाची बाजी लावण्यात येत आहे. केरळमधील वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुसळधार पावसात कर्तव्य बजावताना दिसत आहेत. इलेक्टीक विभागातील चार कर्मचारी डोक्यावर सुरक्षा टोपी आणि अंगावर रेनकोट घालून धो-धो कोसळणाऱ्या पावसात ड्युटी बजावत आहेत. स्वत:ला दोरखंडाशी बांधून घेत वीजेचा प्रवाह सुरू करण्याचा अन् राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी जीवाची बाजी लावताना दिसत आहेत. सध्या, सोशल मीडियावर या कर्मचाऱ्यांचा फोटो व्हायरल होत आहे. नेटीझन्सकडून या कर्मचाऱ्यांना जवांनाची उपमा देण्यात येत आहे. सीमेवर जवान लढत आहेत, तर केरळातही वीज कर्मचारी जवानांप्रमाणेच काम करत आहेत, असा संदेशही लिहिण्यात येत आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूटही करण्यात येत आहे. दरम्यान, केरळमधील पूरस्थिती गंभीर बनली असून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देशाला मदतीचे आवाहन केले आहे.    

दरम्यान, कुन्नूर, वायनाड, कोझिकोड, मलप्पुरम आणि इडुक्की जिल्ह्यांत भूस्खलनाच्या घटना समोर आल्या आहेत. याच दरम्यान गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने मल्लपेरियार धरणाची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांना सूचना केली होती की, धरणाचे दरवाजे उघडण्याआधी सभोवतालच्या परिस्थितीचा आढावा घ्या आणि मगच पाणी सोडा. तसेच मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांनी परिस्थितीवर सामंजस्याने तोडगा काढण्याचे सरकारला सांगितले आहे.

Web Title: Viral Photos of real hero who helps in Kerala Floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.