शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
2
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
4
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
6
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
7
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
8
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
9
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
10
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
11
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
12
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
13
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
14
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
15
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
18
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
19
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय

"मला जेलमध्ये टाका, पण माझ्या १० महिन्यांच्या बाळाला वाचवा"; १६ कोटींच्या इंजेक्शनसाठी बापाची आर्त हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 5:47 PM

16 Crore Rupees Injection : स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी नावाच्या आजारासाठी १० महिन्यांच्या अयांशला हवंय १६ कोटींचं इंजेक्शन. बाळाच्या वडिलांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.

ठळक मुद्देस्पायनल मस्क्युलर अट्रॉफी नावाच्या आजारासाठी १० महिन्यांच्या अयांशला हवंय १६ कोटींचं इंजेक्शन.बाळाच्या वडिलांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.

स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी नावाच्या आजाराचा सामना करत असलेल्या १० महिन्यांच्या अयांश या चिमुकल्याला १६ कोटी रूपयांच्या इंजेक्शनची गरज आहे. अयांशचे वडिल अलोक कुमार सिंह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ते आपल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी लोकांकडे मदत मागताना दिसत आहेत. तसंच १० वर्षांपूर्वी आपल्या भावाकडून जी चूक झाली त्याची शिक्षा आपल्या मुलाला देऊ नये. कोणतीही अफवा पसरवू नये, असं आवाहनही ते करताना दिसत आहेत.

"माझी तुमच्याकडे हात जोडून प्रार्थना आहे, मुलं देवाचं रुप असतात. तुमच्या घरातही मुलं असतील. मुलाप्रती कोणतीही निराळी भावना ठेवू नका. त्याचा जीव वाचवा. माझं नाव अलोक कुमार सिंह आहे आणि माझ्या मुलाचं नाव अयांश आहे. तो एका गंभीर आजारानं त्रस्त आहे. त्याला वाचवण्यासाठी १६ कोटी रूपयांच्या इंजेक्शनची गरज आहे. मी आणि माझी पत्नी दिवसरात्र त्याला वाचवण्यासाठी लोकांकडे मदत मागत आहो. काही लोकं आमच्याविरोधात अफवा पसवत आहेत. माझ्या भावाचं रांचीमध्ये एक इन्स्टीट्यूट होतं जे २०१२ मध्ये बंद झालं त्यात मीदेखील भागीदार होतो असं म्हणत आहेत," असं अयांशचे वडील व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

"इन्स्टीट्यूट बंद झाल्यानंतर २०१४ मध्ये माझं लग्न झालं. माझी आणखी एक मुलगी आहे जिची प्रकृती चांगली आहे. माझ्या एका मुलाचा २०१७ मध्ये जन्म झाला होता. परंतु अशाच आजारामुळे त्याला आम्हाला गमवावं लागलं. अयांशचा सप्टेंबर २०२० मध्ये जन्म झाला. त्याला SMA Type 1 हा आजार आहे. ज्याला आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत," असंही ते म्हणाले. 

१० महिन्यांच्या बाळाला शिक्षा नको"आठ वर्षांपूर्वीच मी माझ्या भावापासून वेगळा झालो. माझ्या भावानं काही चुकीचं केलं किंवा माझ्याकडून काही चूक झाली तर त्याची शिक्षा १० महिन्यांच्या अयांशला का. जर तुम्ही बाळाला वाचवू शकत नसाल तर चुकीची माहिती तरी पसरवू नका. मी माझ्या बाळाच्या आयुष्याची भीक मागत आहे. सरकार किंवा लोकांच्या नजरेत मी चुकीचा असेन तर मला तुरूंगात टाका पण माझ्या बाळाचा जीव वाचवा," असंही ते म्हणत आहेत.

... तर रस्त्यावर का बसलो असतो?"जर माझ्याकडे भरपूर पैसे असते तर मी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दरबारात का गेलो असतो आणि माझ्या मुलाच्या आयुष्याची भीक का मागितली असती. जो बाप आपल्या मुलासाठी मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती या सर्वांकडे मदत मागत आहे त्याची स्थिती तुम्ही समजू शकता. ज्यांना माझ्या खात्याची माहिती हवी आहे त्यांनी एकदा माझ्या घरी यावं त्यांना सर्व माहिती देऊ. सर्व माध्यमं दाखवत आहेत. फेसबुकच्या माध्यमातून मी सातत्यानं अपडेट देत आहे. माझ्या मुलाचा चेहरा पाहा, आमची स्थिती पाहा. त्याचा जीव वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत," असंही अलोक म्हणाले. 

सध्या मदत बंददरम्यान, नितीश कुमार यांनीदेखील लोकांना अयांशला वाचवण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे. ज्यावेळी त्यांच्या मुलाबाबत माध्यमात आलं त्यावेळी लोकांनी मदत करण्यास सुरूवात केली. परंतु गेल्या काही दिवसांपासून मदत पूर्णपणे बंद आहे. यामुळे कुटुंबीय चिंताग्रस्त असल्याचं त्यांनी आजतकशी बोलताना सांगितलं. सध्या त्यांच्याकडे एकूण ६.७२ कोटी रूपयांची रक्कम जमली आहे. परंतु अजूनही १० कोटींची आवश्यकता आहे. आपण मुख्यमंत्र्यांकडेही मदत मागितली परंतु यश आलं नसल्याचं ते म्हणाले. 

अयांशच्या आई-वडिलांनी आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही मदतीसाठी ईमेल केला आहे. तसंच मुख्यमंत्री नितीश कुमार, राज्यपाल फागू चौहान आणि आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनाही पुन्हा मदतीसाठी पत्र लिहिलं आहे.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टरNitish Kumarनितीश कुमारBiharबिहारIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीRamnath Kovindरामनाथ कोविंदprime ministerपंतप्रधानPresidentराष्ट्राध्यक्ष