मुंबई- तुम्हाला बिनभिंतीच्या शाळेत रमण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावसं वाटतं का? आजूबाजूच्या घडामोडी, पर्यावरण याची माहिती घ्यावी असं वाटतं का? असं असेल तर तुम्ही पर्यावरणशास्त्राचा करिअर म्हणून नक्की विचार करावा. झाडे, प्राणी-पक्षी, ट्रेकिंग, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, फोटोग्राफी याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करताना या पर्यायाची माहिती घ्यायला हरकत नाही.आज जगभरामध्ये पर्यावरण हा अगदी सर्वसामान्यांच्या ओठी असलेला परवलीचा शब्द झाला आहे. पर्यावरणाविषयी जागरुकता आणि पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी सतत कोठे ना कोठे तरी प्रयत्न सुरु असल्याचे तुम्हाला दिसत असेल. त्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये पर्यावरण या विषयाला महत्त्व आले आहे.
पर्यावरणात कोणत्या प्रकारच्या पदांवरती काम करता येईल?1) पर्यावरण शास्त्रज्ञ2) एन्व्हायर्नमेंट कन्सल्टंट3) एन्व्हायर्नमेंट सायन्स मॅनेजर4) व्याख्याता4) प्राणीजीवनावरील माहितीपटांची निर्मिती5) पर्यावरण छायाचित्रकार6) पर्यावरण पत्रकार7) कॉन्झर्वेशन हायड्रोलॉजिस्टपर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी कोणते अभ्यासक्रम उपयोगी पडतात?1) सर्टिफिकेट इन एन्व्हायर्नमेंट स्टडिज2) डिप्लोमा इन एन्व्हायर्नमेंट सायन्सेस3) डिप्लोमा इन एन्व्हायर्नमेंट लॉ4) डिप्लोमा इन एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन5) बीएससी इन एन्व्हायर्नमेंट सायन्सेस5) बॅचलर ऑफ एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट6) बॅचवर ऑफ सायन्सेस इम एन्व्हायर्नमेंट सायन्स अँड वॉटर मॅनेजमेंट7) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एन्व्हायर्नमेंट 8) एम.एस.सी इन एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट.