आमचा पक्ष म्हणजे भाजपासारखी दहशतवादी संघटना नव्हे- ममता बॅनर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:59 PM2018-06-21T14:59:53+5:302018-06-21T15:00:10+5:30
गेल्या काही महिन्यांपासून ममता बॅनर्जी या भाजपाविरोधी आघाडी उभारण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
बंगळुरू: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा ही दहशतवादी संघटना असल्याची टीका केली. त्या गुरुवारी कोलकाता येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, आमची संघटना म्हणजे भाजपासारखी दहशतवादी संघटना नाही. ख्रिश्चन, मुस्लिम आणि हिंदूंमध्ये भांडणं लावून देणे हाच त्यांचा उद्योग असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
गेल्या काही महिन्यांपासून ममता बॅनर्जी या भाजपाविरोधी आघाडी उभारण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. तेव्हापासून ममतांनी सातत्याने केंद्र सरकारच्या धोरणांना लक्ष्य केले आहे. पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागामध्ये भाजपाने पक्षविस्तार सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा आपल्या राजकीय रणनितीमध्ये बदल करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मागच्या काही काळात ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या काही निर्णयांवरुन त्या हिंदुत्वाच्या विरोधात असल्याची त्यांची प्रतिमा भाजपाने तयार केली आहे. हीच प्रतिमा बदलण्याचा ममता बॅनर्जींनी प्रयत्न सुरु केला होता.
We are not a militant organisation like the BJP. They are creating fights not only among Christians, Muslims but also among Hindus: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/UQgjsHnhbp
— ANI (@ANI) June 21, 2018
Since BJP came to power they've spread hatred&communal poison against minorities,Muslims in particular&Dalits.Things have come to such stage that govt officer has audacity to question an adult's marriage:A Owaisi on inter-faith couple allegedly harassed at Lucknow passport office pic.twitter.com/DzORbENB6m
— ANI (@ANI) June 21, 2018