लग्नासाठी ती विकणार होती मूत्रपिंड, दिल्लीतील प्रकार, प्रियकराने मागितले होते पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 04:28 AM2017-10-19T04:28:59+5:302017-10-19T04:29:48+5:30
प्रेम आंधळे असते व त्याला काही मर्यादाही नसते, असे म्हणतात. बिहारमधील २१ वर्षांच्या युवतीने प्रियकराशी लग्न करता यावे यासाठी स्वत:चे एक मूत्रपिंड विकण्याचीही तयारी दाखवल्याने त्याचा प्रत्यय आला.
नवी दिल्ली : प्रेम आंधळे असते व त्याला काही मर्यादाही नसते, असे म्हणतात. बिहारमधील २१ वर्षांच्या युवतीने प्रियकराशी लग्न करता यावे यासाठी स्वत:चे एक मूत्रपिंड विकण्याचीही तयारी दाखवल्याने त्याचा प्रत्यय आला.
या युवतीचा घटस्फोट झालेला असून, तिच्या आताच्या प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यासाठी तिच्याकडे १ लाख ८0 हजार रुपये मागितले होते. ती रक्कम देता यावी, यासाठी ती दिल्लीला मूत्रपिंड विकायला आली होती. ती येथील रुग्णालयात त्यासाठी आल्यावर डॉक्टरांनी १८१ क्रमांकाच्या वुमन हेल्पलाइनवर संपर्क साधून पोलिसांना कळवले. दिल्ली महिला आयोगाच्या पदाधिकारी रुग्णालयात आल्यावर तिने सांगितले की मी घटस्फोटानंतर बिहारमध्ये पालकांसोबत राहत होते. तिथे माझी शेजारी राहणाºयाशी तरुणाशी ओळख झाली. परंतु,
तिच्या या लग्नाला तिच्या पालकांचा विरोध होता़
प्रकरण बिहारच्या महिला आयोगाकडे
आयोगाच्या सदस्याने तिचे समुपदेशन करून तिने तिच्या प्रियकराविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असा सल्ला दिला. परंतु ती तक्रार न देता तिच्या पालकांसोबत बिहारला गेली. दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणाचा तपशील बिहार महिला आयोगाला पाठवला असून त्या इसमाविरुद्ध तिने फौजदारी कारवाई करावी, यासाठी तिला मदत करण्याची विनंतीही आयोगाला केली आहे.