नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये केलेल्या भाषणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी उपहासात्मक टीका केली होती. मात्र ही टीका कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्यावरच उलटली असून, ट्विटर युझर्सनी त्यांचीच हजेरी घेण्यास सुरुवात केली. कपिल सिब्बल यांनी लोकशाहीवर ज्ञान देणे ट्विटरवरील युझर्सना फारसे रुचले नाही. त्यांनी काँग्रेसलाच उलट आरसा दाखवण्यास सुरुवात केली. (went to teach democracy lessons to Modi and Kapil Sibal became a troll)
सिब्बल म्हणाले होते की, संयुक्त राष्ट्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचा जगातील सर्वं लोकशाहींची जननी असा उल्लेख केला. आता योगी आणि हिमंता बिस्व शर्मा यांनी मोदींचे हे बोल ऐकले असतील, अशी अपेक्षा आहे. कपिल सिब्बल यांनी या माध्यमातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांच्या लोकशाहीबाबतच्या कटिबद्धतेवर शंका उपस्थित केली. भाजपाचे हे दोन्ही मुख्यमंत्री फायरब्रँड म्हणून ओळखले जातात. तसेच हिंदुत्वाच्या राजकारणाचे ते चर्चित चेहरेही आहे. त्यातील हिमंता बिस्व शर्मा हे तर आधी काँग्रेसचमध्येच होते. दरम्यान, नेटिझन्सना कपिल सिब्बल यांची ही टिप्पणी रुचली नाही. ते त्यांना ट्रोल करू लागले.
सुमन मंडल नावाच्या एका ट्विटर युझरने लिहिले की, कपिल सिब्बल जी, तुम्ही आणि तुमचे जी-२३ मधील सहकारी लवकरच काँग्रेसमध्ये लोकशाही स्थापित करण्यामध्ये आणि मेरिटोक्रसीला प्रमोट करण्यामध्ये लवकरच सक्षम व्हाल अशी मी अपेक्षा करते.