नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) निवडणुकीचे वातावरण जबरदस्त तापले आहे. यातच भारतीय जनता पक्ष (BJP) सातत्याने आपली ताकद वाढवतो आहे. भाजप सात्याने विरोधी पक्षाच्या किल्ल्याला सुरूंग लावताना दिसत आहे आणि विरोधी पक्षातील नेतेही भाजपत डेरे दाखल होत आहेत. यातच भाजपला आज (शनिवारी) आणखी एक मोठे यश मिळाले. नुकतेच पश्चिम बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला बाय-बाय करणारे माजी कंद्रीयमंत्री दिनेश त्रिवेदी (Dinesh trivedi) यांनी दिल्ली येथे भाजपच्या मुख्यालयात भाजपचे कमळ हाती घेतले आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (jp nadda), केंद्रीयमंत्री पीयूष गोयल आणि धर्मेन्द्र प्रधान उपस्थित होते. (Dinesh trivedi joins bjp in presence with party national president jp nadda)
ममता बॅनर्जींना अजून एक धक्का, आखणी एका मोठ्या नेत्याने केला भाजपात प्रवेश
भाजपत येणे हा एक सुवर्ण क्षण -यावेळी, भाजपत येणे हा एक सुवर्ण क्षण असल्याचे म्हणत दिनेश त्रिवेदी यांनी बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर हल्ला चढवला. त्रिवेदी म्हणाले, “आज तो स्वर्णक्षण आहे, ज्याची मी वाट पाहात होतो. जनता सर्वोपरी आहे, म्हणून आज आपण सार्वजनिक जिवनात आहोत. एक राजकीय पक्ष असा असतो, ज्यात कुटुंब सर्वोपरी असते. आज मी खऱ्या अर्थाने जनतेच्या कुटुंबात सामील झालो आहे. याचा होतू जनतेची सेवा आहे.”
तेथे केवळ एका कुटुंबाचीच सेवा होते -यापूर्वी मी ज्या पक्षात होतो, तेथे केवळ एका कुटुंबाचीच सेवा होत होती. जनतेची नाही. आज बंगालमध्ये अशी परिस्थिती आहे, की तेथील जनता मला फोन करून म्हणते, की आपण या पक्षात काय करत आहात. आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की एखादी शाळा बांधण्यासाठीही लाच द्यावी लागते. बंगालमध्ये सातत्याने हिंसाचार वाढत आहे. येथील जनता हिंसाचार आणि भ्रष्टाचाराने त्रस्त झाली आहे. मात्र, आता परिवर्तन होत असल्याने बंगालमधील जनात आनंदात आहे, असेही दिनेश त्रिवेदी म्हणाले.
"...तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी करूशकतात भाजपशी हात मिळवणी"; मोठ्या नेत्याचा दावा!
दोन वेळा लोकसभा तर 3 वेळा राज्यसेभेचे खासदार -दिनेश त्रिवेदी यांनी 12 फेब्रुवारीला टीएमसीचा राजीनामा दिला होता. ते 2011 ते 2012 पर्यंत रेल्वे मंत्री होते. ते दोन वेळा लोकसभा तर 3 वेळा राज्यसेभेचे खासदार राहिले आहेत. 2009 मध्ये ते पहिल्यांदाच बेरकपूर मधून खासदार झाले होते.
ममतांना जबर धक्का, TMC मध्ये उभी फूट! तब्बल 10 आमदारांसह तीन खासदार भाजपच्या संपर्कात?