मुंबई व दिल्लीमध्ये खड्डे किती आहेत? सुप्रीम कोर्टाचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 05:30 AM2018-07-13T05:30:17+5:302018-07-13T05:30:52+5:30
मुंबई व दिल्ली या दोन महानगरांतील जीवघेण्या खड्ड्यांविषयी संताप व्यक्त करतानाच, तिथे किती खड्डे आहेत, याची आकडेवारी द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले.
नवी दिल्ली : मुंबई व दिल्ली या दोन महानगरांतील जीवघेण्या खड्ड्यांविषयी संताप व्यक्त करतानाच, तिथे किती खड्डे आहेत, याची आकडेवारी द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. हे खड्डे मोजायला अधिकाऱ्यांना किती वेळ लागेल, असेही न्यायालयाने सरकारला विचारले.
एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने खड्ड्यांमुळे होणारे अपघात व जीवितहानी यांचा उल्लेख केला. सरकार व महापालिकेसारख्या संस्था याबाबत नेमके काय करतात, असा सवाल करून न्यायालयाने दोन शहरांतील खड्ड्यांविषयी कधी माहिती आमच्यासमोर सादर कराल, असा सवालही केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे २0१४ च्या तुलनेत कमी झाल्याचा दावा केला होता. पण आता सरकारला न्यायालयालाच उत्तर द्यावे लागणार आहेत. राज्यात सर्वाधिक अपघात मुंबईत होतात व त्यात मरणाºयांची संख्याही सर्वाधिक असते. बरेच अपघात खड्यांमुळेच होतात. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहनांतून जाणाºया अनेकांना पाठीचे व मानेचे आजारही होतात. बहुधा त्यामुळेच देशाची राजधानी व आर्थिक राजधानी या महानगरांतील खड्ड्यांची सर्वोच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागली आहे.