मोदींना हिंदुत्व समजलेच नाही; राहुल गांधींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 01:17 PM2018-12-01T13:17:06+5:302018-12-01T13:51:26+5:30

राजस्थान विधानसभा निवडणुकीआधी भाजपा आणि काँग्रेस एकमेकांवर टीका करत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उदयपूरमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सर्जिकल स्ट्राइकवरून निशाणा साधला आहे.

What kind of Hindu is PM Modi, asks Rahul Gandhi | मोदींना हिंदुत्व समजलेच नाही; राहुल गांधींचा आरोप

मोदींना हिंदुत्व समजलेच नाही; राहुल गांधींचा आरोप

Next
ठळक मुद्देकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उदयपूरमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सर्जिकल स्ट्राइकवरून निशाणा साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू असले तरी त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीच माहीत नाही. मोदी नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत ? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे. 

उदयपूर - राजस्थान विधानसभा निवडणुकीआधी भाजपा आणि काँग्रेस एकमेकांवर टीका करत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उदयपूरमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सर्जिकल स्ट्राइकवरून निशाणा साधला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू असले तरी त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीच माहीत नाही. गीतेत काय म्हटले आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण मोदींना हिंदुत्वाबद्दल माहिती नाही. ते नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत ? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे. 

सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय सैन्याचा होता. पण मोदींनी त्याचे श्रेय घेऊन राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला, असेही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मनमोहन सिंग सरकारच्या काळात तीन वेळा सर्जिकल स्ट्राइक झाले होते. सैन्याचे अधिकारी ज्या वेळी मनमोहन सिंग यांच्याकडे गेले त्यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबत गोपनीयता बाळगावी अशी विनंती केली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या क्षेत्रात प्रवेश केला. सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. 



खासगी शिक्षण संस्था चांगल्या असतात हा एक गैरसमज आहे. सरकारच्या मदतीशिवाय आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात पुढे जाता येणार नाही असेही राहुल गांधी यांनी कार्यक्रमात म्हटले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी मंत्रिमंडळाला एका खोलीत बंद केले आणि मग हा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले आणि दोन लाख लोकांना उद्ध्वस्त केले असे ही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 




 

Web Title: What kind of Hindu is PM Modi, asks Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.