नरेंद्र मोदी नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत?, राहुल गांधी यांचा रोकडा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 03:56 AM2018-12-03T03:56:05+5:302018-12-03T03:57:49+5:30
आपण हिंदू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असतात. पण त्यांना हिंदुत्वाचा गाभाच कळलेला नाही.
जयपूर : आपण हिंदू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असतात. पण त्यांना हिंदुत्वाचा गाभाच कळलेला नाही. त्यामुळे ते कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत असा प्रश्न पडतो, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते म्हणाले, हिंदू धर्माच्या विचाराचे सारतत्व काय हे समजून घ्यायला हवे. भगवद्गीतेत म्हटले आहे की, ज्ञान हे सर्वांसाठी व सर्वच लोकांकडे असते. प्रत्येक जिवंत प्राण्याकडे उपजत ज्ञान असतेच. मात्र आपल्या पंतप्रधानांनी हिंदू धर्माची तत्वे नीट समजून घेतलेली नाहीत.
राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी उपरोधाने म्हटले की, हिंदुत्व नेमके काय असते हे काँग्रेस आता आम्हाला समजावू लागली आहे. ते भगवद्गीतेतील विचारांचे धडे आम्हाला देत आहेत. ‘तशी' वेळ कधीही न येवो परराष्ट्र खात्याच्या मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले की, हिंदुत्वाचा अर्थ राहुल गांधींकडून समजावून घेण्याची वेळ यावी असा दिवस जनतेच्या आयुष्यात कधीही न उजाडो.