कोणत्या उद्योजकांनी व्यक्तिश: दिली देणगी? राजकीय पक्षांसाठी कोण झाले दानशूर? वाचा यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 11:43 AM2024-03-23T11:43:27+5:302024-03-23T11:43:46+5:30

व्यक्तिश: दिलेल्या बहुतेक देणग्या भाजपच्या पदरात

Which entrepreneurs have personally donated? Who has become a donor for political parties? Read the list | कोणत्या उद्योजकांनी व्यक्तिश: दिली देणगी? राजकीय पक्षांसाठी कोण झाले दानशूर? वाचा यादी

कोणत्या उद्योजकांनी व्यक्तिश: दिली देणगी? राजकीय पक्षांसाठी कोण झाले दानशूर? वाचा यादी

Electoral Bonds: नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत सुनावल्यानंतर अखेर भारतीय स्टेट बँकेने गुरुवारी निवडणूक रोखे संदर्भातील सर्व माहिती निवडणूक आयोगाच्या स्वाधीन केली आणि नंतर लगेच आयोगाने ती माहिती आपल्या संकेतस्थळावर सार्वजनिक केली. या माहितीत युनिक अल्फान्यूमरिक नंबरचा समावेश आहे, ज्यावरून कोणत्या कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाच्या नावे किती रकमेचे निवडणूक रोखे खरेदी केले आणि संबंधित राजकीय पक्षाने त्यापैकी किती रोख्यांचे रोखीकरण केले, याबाबतची संपूर्ण माहिती मिळते. सार्वजनिक करण्यात आलेल्या याच ताज्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आल्यानंतर जे काही हाती लागले, ते येथे देत आहोत...

  • निम्म्यापेक्षा जास्त देणग्या भाजपला- हैदराबाद येथील ‘मेघा इंजिनीअरिंग’ या कंपनीने भाजपला सर्वाधिक ५८४ काेटी, ‘क्विक सप्लाय चेन’ या कंपनीने ३७५, ‘वेदांता’ने २३० काेटी आणि ‘भारती एअरटेल’ने १८३ काेटी रुपयांची देणगी दिली.
  • काँग्रेसला काेणी-काेणी दिल्या देणग्या?- काँग्रेसला सर्वाधिक देणगी ‘वेदांता’ने दिली. ‘वेदांता’ने १२५ काेटी, ‘एम. के. जे. एंटरप्रायजेस’ने १२० काेटी आणि ‘वेस्टर्न यूपी पाॅवर ट्रान्समिशन’ने ११० काेटी रुपयांची देणगी राेख्यांच्या माध्यमातून मिळाली.
  • तृणमूल काँग्रेसला किती?- तृणमूल काँग्रेसला ५४२ काेटी रुपयांची सर्वाधिक देणगी फ्युचर गेमिंग अँड हाॅटेल सर्व्हिसेस या कंपनीने दिली आहे. त्याखालाेखाल २८ काेटी रुपये हल्दीया एनर्जीने राेख्यांच्या माध्यमातून दिले.

  • व्यक्तिश: दिलेल्या बहुतेक देणग्या भाजपच्या पदरात
  • एल. एन. मित्तल यांनी भाजपला दिले ३५ कोटी रुपये

(रक्कम कोटींत)

पक्षनिहाय देणगीदार आणि रक्कम

  • बीजेडी

एस्सेल मायनिंग    १७४.५
जिंदाल स्टील व पाॅवर    १००
उत्कल ॲल्युमीना    ७०
रुंगटा सन्स    ५०
एस. एन. माेहांती    ४५
रश्मी सिमेंट    ४५
वेदांता    ४०
पेंग्विन ट्रेडिंग    ३०.५
जिंदाल स्टेनलेस    ३०
रश्मी मेटालिक्स    २७
इतर    १६३.५

  • बीआरएस

मेघा इंजिनीअरिंग    १९५
यशाेदा हाॅस्पिटल    ९४
चेन्नई ग्रीनवूड्स    ५०
डाॅ. रेड्डीज लॅब    ३२
हेटेराे ड्रग्ज    ३०
आयआरबी एमपी एक्स्प्रेस-वे    २५
ऑनर लॅब्स    २५
एनएसएल एसइझेड    २४.५
एल७ हायटेक    २२
इतर    ६९३

  • डीएमके

फ्युचर गेमिंग    ५०३
मेघा इंजिनीअरिंग    ८५
इतर    ४४

  • वायएसआरसीपी

फ्युचर गेमिंग    १५४
मेघा इंजिनीअरिंग    ३७
रॅम्काे सिमेंट    २४
ऑस्ट्राे जैसलमेर    १७
ऑस्ट्राे मध्य प्रदेश विंड    १७
स्नेहा कायनेटिक पाॅवर    १०
इतर    ६९.८

  • टीडीपी

शिर्डी साई इलेक्ट्रिकल्स    ४०
मेघा इंजिनीअरिंग    २८
वेस्टर्न यूपी पाॅवर    २०
नॅटकाे फार्मा    १४
डाॅ. रेड्डीज    १३
भारत बायाेटेक    १०
इतर    ८६.६

बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन    ८५
क्विक सप्लाय    २५
इतर    ४२.५

  • जेडीएस

नारा कन्स्ट्रक्शन    १०
रित्त्विक प्राेजेक्ट    १०
इतर    २१

  • आरजेडी  

आयएमबी ॲग्राे    ३५
इतर    ३७.५

क्विक सप्लाय चेन    १०
इतर    १८.५

  • आप

अवीस ट्रेडिंग    १०
इतर    ५५.३
जेडीयू 
मेघा इंजिनीअरिंग    १०
इतर    १२
(आकडे काेटी रुपयांमध्ये)

टॉप सहा कंपन्यांनी काेणाला किती दिली देणगी?

  • फ्युचर गेमिंग    १,३६५

तृणमूल    ५४२
डीएमके    ५०३
वायएसआरसीपी     १५४
बीजेपी    १००
इतर    ६०

  • मेघा इंजिनीअरिंग    १,१८६

भाजप    ४६४
बीआरएस    १९५
काँग्रेस    १२४
डीएमके    ८५
इतर    ११४ 

  • संजीव गाेयनका समूह    ६०६

तृणमूल    ४५९
भाजप    १२७
काँग्रेस    १५ 
बीआरएस    ५

  • केव्हेंटर समूह    ५७३

भाजप    ३४५
काँग्रेस    १२२
तृणमूल    ६५
इतर    ३८.५

  • आदित्य बिर्ला समूह    ५४३

भाजप    २७५
बीजेडी    २६४.५
शिवसेना    ३
काँग्रेस    ०.१

  • क्विक सप्लाय    ४१०

भाजप    ३७५
शिवसेना    २५
राष्ट्रवादी काँग्रेस    १०

 

Web Title: Which entrepreneurs have personally donated? Who has become a donor for political parties? Read the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.