कोण आहेत आरबीआयचे नवे गव्हर्नर शक्तिकांता दास...जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 07:14 PM2018-12-11T19:14:53+5:302018-12-11T19:33:03+5:30
दास यांनी महिंद्रा वर्ल्ड सिटीमध्ये खासगी क्षेत्रातील कंपनीच्या प्रतिनियुक्तीवरही काम केले आहे.
मुंबई : शक्तिकांता दास हे तामिळनाडू केडरचे 1980 बॅचचे निवृत्त सनदी अधिकारी आहेत. आरबीआयचे गव्हर्नर होण्याआधी ते पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य होते. आय़एएस अधिकारी म्हणून त्यांनी केंद्र आणि तामिळनाडूमध्ये वेगवेगळ्या पदांवर सेवा बजावली होती. आर्थिक, महसूल, खते या महत्वाच्या खात्यांचे ते सचिव होते.
दास यांनी महिंद्रा वर्ल्ड सिटीमध्ये खासगी क्षेत्रातील कंपनीच्या प्रतिनियुक्तीवरही काम केले आहे. जून 2014 मध्ये दास यांची केंद्रीय महसूल सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी 31 ऑगस्ट 2015 ला त्यांना हे पद सोडावे लागले. यानंतर शक्तीकांता दास यांनी केंद्रीय आर्थिक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. या काळात दास हे एक भारतातील ताकदवान व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. 28 मे 2017 मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली.
Shaktikanta Das, a member of the 15th Finance Commission and former Economic Affairs Secretary, has been appointed as the RBI Governor, a day after Urjit Patel quit abruptly
— ANI Digital (@ani_digital) December 11, 2018
Read @ANI story | https://t.co/FXt8CxT5Vbpic.twitter.com/XJpNLJphK4
निवृत्तीनंतर दास यांची पंधराव्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक करण्य़ात आली. तसेच त्यांच्यावर जी-20 परिषदेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारीही होती.