मुंबई : प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार हवे ते खावे, पण त्यासाठी ‘बीफ फेस्टिव्हल’ आयोजित करण्याची काय आवश्यकता आहे? उद्या कोणाचे चुंबन घ्यावेसे वाटले तर ‘किस फेस्टिव्हल’चे आयोजन करणार का, असा सवाल उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे केला.के. ए. पोदार कॉलेज आॅफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स या संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम झाला. राष्ट्रपती प्रमुख पाहुणे होते. गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, आ. माधुरी मिसाळ, संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल जैन आणि प्राचार्या शोभना वासुदेवन उपस्थित होते.सरकारच्या गोमांसबंदीच्या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून बीफ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते, असे ते म्हणाले.पालकांनी पाल्याकडे लक्ष द्यावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. अनेक विद्यार्थी शिक्षण घेताना तणावाखाली असतात. पालकांनी मुलांवरचा ताण ओळखला पाहिजे, असे ते म्हणाले. मुलांवरचा ताण वेळीच ओळखल्यास त्यांना या तणावातून बाहेर काढून त्यांचे भवितव्य घडवण्यास मदत होइल, असा सल्ला त्यांनी पालकांना दिला.विद्यार्थ्यांशी संवाद साधाताना ते म्हणाले की, आपल्या आईला आणि गुरूंना कधीच विसरू नका. जन्मभूमी, मातृदेशाचा आदर ठेवा. मातृभाषेवर प्रेम करा. मातृभाषेतूनच आपण बोलायला शिकतो. ती भाषा आपल्या सहज लक्षात येते. कारण ती आपली भाषा असते. म्हणूनच तर आपण आपल्या मातृभाषेत जास्त चांगल्या प्रकारे आपले म्हणणे मांडू शकतो. त्यामुळेच मातृभाषेचा न्यूनगंड बाळगू नका, असे ते म्हणाले.देशातील २५ टक्के लोकसंख्या ही दारिद्र्यरेषेखाली आहे. या जनतेच्या समस्या कशा सोडवता येतील याचा विचार तरुणांनी करायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला. देशासहजगावर आज दहशतवादाचे मोठ्या प्रमाणावर सावट आहे. ज्याने देशाची संसद उडवण्याचा कट रचला त्या अफजल गुरूचा जयजयकार का, असा संतप्त प्रश्नही नायडू यांनी या वेळी उपस्थित केला....तर ‘किस फेस्टिव्हल’चे आयोजन करणार का?प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार हवे ते खावे, पण त्यांच्या आवडीसाठी फेस्टिव्हल आयोजित करण्याची आवश्यकता काय? उद्या कोणाचे चुंबन घ्यावेसे वाटले तर ‘किस फेस्टिव्हल’चे आयोजन करणार का, असा प्रश्नही उपराष्ट्रपती यांनी उपस्थित केला.
बीफ फेस्टिव्हलचे आयोजन कशासाठी? उपराष्ट्रपती - उपराष्ट्रपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 6:31 AM