यामुळे भाजप टाळत आहे राम मंदिराचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 12:31 PM2019-03-31T12:31:05+5:302019-03-31T13:42:32+5:30

राम मंदिर मुद्दा समोर करून नेहमी निवडणुका लढवणाऱ्या भाजपने २०१४ मध्ये मात्र गुजरातच्या विकास कामाचा गाजावाजा करत मोदींचा चेहरा समोर आणला. २०१४ मध्ये भाजपला मोठ यश मिळाले आणि २८२ जागांवर भाजपला विजय मिळवता आला.

why BJP is avoiding the issue of Rama Mandir | यामुळे भाजप टाळत आहे राम मंदिराचा मुद्दा

यामुळे भाजप टाळत आहे राम मंदिराचा मुद्दा

Next

मुंबई - राम मंदिरासाठी आग्रही असणार भाजप आता याविषय का बोलत नाही, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत राम मंदिराच्या नावाने प्रचार करणारा भाजप २०१४ मधील निवडणुकीत मात्र राम मंदिराच्या मुद्द्यावर मावळती भूमिका घेतना दिसला. यामुळेच कि काय भाजपला २०१४ निवडणुकीत यश सुद्धा मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राम मंदिर बाबत नरेंद्र मोदी यांना अनेकदा आठवण सुद्धा करून दिली. मात्र मोदी यांनी राम मंदिर बाबत बोलणे आणि संघाला उत्तर देन टाळले.

भारतीय जनता पार्टीने १९८४ मध्ये पहिली निवडणुक लढवली व यात त्यांना २ जागांवर विजय मिळवता आला. भाजपने १९८९ मध्ये मात्र राम मंदिराच्या मुद्दा पुढे करत निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपला मोठ यश सुद्धा मिळाले आणि बगता-बगता २ जागांवर निवडून आलेल्या भाजपचा आकडा ८५ जागांच्या आसपास जाऊन पोहचला. याच काळात लालकृष्णा अडवाणी यांनी रथ यात्रा काढली. पुढे १९९१ मध्ये पुन्हा निवडणुक झाली आणि यात भाजपने शतक पार करत आणि १२० जागांच्या आसपास निवडून आणल्या. त्यानंतर भाजप नेहमी राम मंदिराचा मुद्दा आपल्या
निवडणुकीत पुढे करत राहिली.


राम मंदिर मुद्दा समोर करून नेहमी निवडणुका लढवणाऱ्या भाजपने २०१४ मध्ये मात्र गुजरातच्या विकास कामाचा गाजावाजा करत मोदींचा चेहरा समोर आणला. राम मंदिराच्या मुद्याला बाजूला करून मोदी लाट निर्माण करण्यात भाजपला यश सुद्धा आले आणि २०१४ मध्ये भाजपला मोठ यश मिळाले. याच मोदी लाटेत भाजपला २८२ जागांवर विजय मिळवता आला. हे यश मोदी लाट मुळे आल्याचे भाजला कळून चुकले होते. त्यामुळेच राम मंदिराच्या लाटे पेक्षा मोदी लाटेत जास्त जागा मिळत असल्याने भाजपने राम मंदिर हा विषय बाजूला करण्याच्या प्रयत्न केला आहे. आणि हेच कारण आहे ज्यामुळे भाजप नेते आणि मंत्री राम मंदिर विषय वर बोलण्याचे टाळत आहे. त्यामुळे अनेक वर्षोनुवर्षे राम मंदिर वही बनायांगे म्हणणार भाजप आता सत्ता डोळ्या समोर दिसत असल्याने विकासाच्या गप्पा मारत आहे.

Web Title: why BJP is avoiding the issue of Rama Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.